नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – न्यायालयाने प्रौढ मुलीच्या वडिलांकडून आर्थिक मागणीसंदर्भात अर्जाला परवानगी दिली आहे. कोर्टाने वडिलांना मुलीला देखभालीची रक्कम म्हणून दहा हजार रुपये देण्यास सांगितले आहे. मुलगी प्रौढ असल्याचा आणि तिला आता देखभालीची मागणी करण्याचा अधिकार नाही असा वडिलांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
कडकडडूमा येथील कौटुंबिक न्यायालयाने आपल्या निकालात असे म्हटले आहे की, कायद्यानुसार, मुलीला तिचा सर्व खर्च वडिलांकडून मिळू शकतो. जर वडील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील आणि मुलीला भरणपोषण देऊ शकत नसतील तर मुलीला वडिलांच्या दर्जाप्रमाणे भरणपोषणाचा हक्क मिळेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
या प्रकरणी १९ वर्षीय मुलीने उच्च शिक्षणाचा खर्च देण्याची मागणीही वडिलांकडून न्यायालयासमोर ठेवली होती. वडील व्यवसायाने व्यापारी आहेत. पण मुलगी प्रौढ झाल्याचं कारण देत शिक्षणाचा खर्च उचलायलाही वडिलांनी नकार दिला होता. वडिलांनी सांगितले की, मुलगी लहानपणापासूनच आईसोबत होती. त्यामुळे मुलीला उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर ती त्याची जबाबदारी नाही, तिची आणि तिच्या आईची जबाबदारी आहे.
यावर न्यायालयाने वडिलांना फटकारले आणि म्हटले की, बाप हा मुलांसाठी छतासारखा असतो. पण मुलीला उच्च शिक्षण देण्यासाठी वडील सक्षम असतील तर त्यांना हे कर्तव्य पार पाडावेच लागेल. मुलीच्या उच्च शिक्षणाचा सर्व खर्च वडिलांनी उचलण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या १९ वर्षीय मुलीच्या आई आणि वडिलांचा सात वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. वडिलांनी दुसरं लग्न केलंय. आई एका खाजगी शाळेत शिक्षिका आहे. आईच्या पगारातून घर चालवता येत नाही, तर वडील व्यापारी आहेत, असे मुलीने याचिकेत म्हटले आहे. त्यांचे मासिक उत्पन्नही तीन लाख रुपयांहून अधिक आहे. मात्र तरी ते मुलीचा खर्च भरत नाही.
न्यायालयाने सांगितले की, मुलीसाठी, कायदा विशेषत: असे नमूद करतो की जोपर्यंत मुलगी स्वतःचा खर्च उचलू शकत नाही तोपर्यंत ती वडिलांची जबाबदारी आहे. लग्नानंतर ही जबाबदारी आपोआप तिच्या पतीकडे जाते. त्यापूर्वी, वडील कोणत्याही परिस्थितीत मुलीचा खर्च उचलण्यापासून पळ काढू शकत नाहीत.
वडिलांच्या वतीने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची वार्षिक उलाढाल १५ लाखांहून अधिक असल्याचे समजते. वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही ते आपल्या मुलीवर खर्च करण्यास तयार नव्हते. अशा परिस्थितीत सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने मुलीच्या पालनपोषणासह तिच्या शिक्षणाचा खर्च वडिलांना उचलण्याचे आदेश दिले आहेत.
Family Court order Father daughter Expenses Responsibility Dispute