इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती-पत्नीमध्ये प्रेम जिव्हाळा असणे सहाजिक असते, त्याचप्रमाणे त्यांचे भांडण होणे ही देखील एक साहजिक गोष्ट मानली जाते, परंतु काही वेळा अगदी शुल्लक कारणावरून भांडण विकोपाला जाते. काही पती तर आपल्या पत्नीला किरकोळ कारणावरून मारहाण देखील करतात. अशाच एका पतीने आपल्या अपंग असलेल्या पत्नीला जेवण चांगले बनवत नाही, म्हणून मारहाण केली अखेर हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन गेले, त्यावेळी केंद्राने पतीला यापुढे पत्नीशी चांगले वागण्याचा सल्ला दिला, तसेच बनविलेले जेवण चवीने खाण्याचा देखील सूचना केली, इतकेच नव्हे तर पत्नीने वरणाला फोडणी दिली नाही, तरी बिन फोडणीचे वरण साधे वरण खावे लागेल असेही सुनावले.
बिहारच्या पुर्णिया जिल्ह्यातील हे प्रकरण असून पत्नी पोलिसांकडे पोहचली, त्यानंतर पत्नी पोलीस कुटुंब समुपदेशन केंद्रात पोहचली. स्वादिष्ट पदार्थ बनवत नसल्याचा आरोप करीत पती मारहाण करतो, अशी पत्नीने पतीची तक्रार केली. त्यानंतर आता दोघांमध्येही समझोता झाला. केंद्रीय समाज कल्याण बोर्डाद्वारे कुटुंब समुपदेशन केंद्राची योजना 1983 ला सुरू करण्यात आली. या सर्व केंद्रांवर कौटुंबिक वाद, सामाजिक बहिष्कारातील पीडित महिला, मुलांसाठी सल्ला, पुनर्वसन यासारख्या सेवा पुरविल्या जातात. केंद्र स्थानिक पोलीस, कोर्ट आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने काम करतात.
या प्रकरणाशी संबंधित महिला दिव्यांग आहे. पत्नी स्वादिष्ट जेवण बनवत नाही म्हणून पती मारहाण करत होता. त्रासून जाऊन पत्नी पोलीस कुटुंब समुपदेशन केंद्रात पोहचली. तिने तक्रारीत म्हटलं, मी दिव्यांग महिला आहे. आपल्या घरी स्वतः स्वयंपाक करते. जेवण स्वादिष्टचं करते. परंतु, माझ्या पतीला मी तयार केलेले अन्न चांगले लागत नाही. त्यामुळे ते मला मारहाण करतात. मला घर सोडून जाण्यास सांगितले जा, अशी धमकी दिली जाते.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या पतीला बोलावले. दोघांनीही एक दुसऱ्यावर आरोप केले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर केंद्रातील सदस्यांनी त्यांना सांगितलं की, आता तुम्ही वाद घालायचा नाही. दोघांनाही मिळून-मिसळून राहण्याचा सल्ला दिला. दोघांसाठी एक सहमती पत्र तयार करण्यात आला. दोघेही सोबत राहून स्वयंपाक करतील. पत्नी दाळीच्या वरणाला फोडणी देणार नाहीत. दोघांनाही सोबत राहण्याचा सल्ला दिला गेला. दोघांनाही वेगवेगळे बसून समजावून सांगण्यात आले. त्यानंतर दोघांमध्ये सहमती झाली त्यानंतर दोघे समाधानाने घरी गेले.
Family Counselling Centre Husband Wife Interesting Punishment