नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फलक रेखाटनातून राम नवमीच्या कलाशिक्षक देव हिरे यांनी शुभेच्छा दिल्या आहे. चांदवडच्या शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव येथील कलाशिक्षक हिरे हे नेहमीच आपल्या कलेव्दारे फलक रेखाटून शुभेच्छा देत असतात.
त्यांनी राम नवमीच्या शुभेच्छा देतांना म्हटले आहे की, भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी १२ वाजता झाला. हिंदू धर्मातील शुभ सणांपैकी एक सण म्हणजे रामनवमी होय. संपूर्ण भारतात व जगात जेथे हिंदू लोक आहेत तेथे मोठ्या उत्साहात रामनवमी हा सण साजरा केला जातो.
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम जन्मोत्सव निमित्त सर्वत्र रामायण,रामरक्षा स्तोत्र व मंत्रांचे पठण केले जाते. आदर्श,धार्मिकता,प्रेम,बंधुता, आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रत्येक हिंदू भारतीयाने प्रभू श्रीरामाचे गुण आपल्या जीवनात अंगिकारावेत व प्रभू श्रीरामावरील भक्ती व विश्वासाचे नूतनीकरण या सणानिमित्त करावे हीच अपेक्षा. फलक रेखाटनातून राम नवमी सणाच्या भक्तिमय शुभेच्छा ! जय श्रीराम !