सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आभासी फसवणूक करणाऱ्यांवर फेकबस्टरचा अंकूश

by India Darpan
मे 20, 2021 | 7:16 am
in इतर
0
social media 11

नवी दिल्ली – पंजाब इथल्या रोपारमधील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधकांनी एक अनोखी पडताळणी प्रणाली (डिटेक्टर) विकसित केले आहे. कोणालाही कळू न देता आभासी बैठकांमधे सहभागी होणाऱ्या आभासी चोरांना फेकबस्टर नावाची ही प्रणाली हुडकून काढते. सामाजिक माध्यमांवर (सोशल मिडियावर) बदनामी करणे किंवा खिल्ली उडवणे अशा कामात गुंतलेल्यांचे चेहरे उघडे पाडण्याचेही काम फेकबस्टर करु शकते.

सध्याच्या महामारीच्या काळात अनेक कार्यालयीन, अधिकृत बैठका ऑनलाईनच होत असतात. अशात आभासी बैठकीत एखाद्या सहभागी सदस्याच्या चित्रीकरणात कोणी फेरफार करत असेल तर आयोजकांना ते हुडकून काढण्यात फेकबस्टर उपयोगी ठरेल. म्हणजे आभासी बैठक किंवा बेबिनारमधे कुणी एखाद्याच्या वतीने अथवा त्याच्या चेहऱ्याचा वापर करुन अवैधरित्या घुसखोरी करत असेल तर ही प्रणाली ते शोधू शकते.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन  माध्यमांमधे प्रसारित होणाऱ्या साहित्यात फेरफार करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हे तंत्रज्ञान अधिकाधिक प्रगत आणि स्थायी होत चालले आहे. यामुळे व्यवस्था सुरक्षित राखण्यासाठी अशा गैरकृत्याचा शोध घेणे दिवसेंदिवस कठीण होत चालल्याचे डॉ. अभिनव धाल यांनी म्हटले आहे. फेकबस्टर विकसित करणाऱ्या चार सदस्यीय पथकाचे ते प्रमुख सदस्य आहेत. फेकबस्टरने ९० टक्के अचूकता साध्य केली आहे असेही त्यांनी सांगितले. डॉ. धाल याच्यांसोबत सह प्राध्यापक रामनाथन सुब्रमण्यम, विद्यार्थी विनित मेहता आणि पारुल गुप्ता हे या पथकातील सदस्य आहेत.

फेकबस्टर प्रणाली आभासी बैठकातील गैरसहभाग शोधून काढते. याबाबतचा प्रबंध गेल्या महिन्यात २६ तारखेला अमेरिकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला. इंटेलिजेंट यूजर इंटरफेसेस हा परिषदेचा विषय होता.  ही सोफ्टवेयर प्रणाली आभासी बैठकांसाठी वैयक्तिकृत व्यासपीठ असून झूम आणि स्काईप सारख्या अॅप्लीकेशनवर त्याची चाचणी घेण्यात आली आहे.

 फेकबस्टर हे ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजेच इंटरनेट सुरु असताना आणि बंद असतानाही वापरता येते. सध्यातरी याचा वापर लॅपटॉप आणि संगणकावरच करता येतो. बोगस ऑडीओ म्हणजेच बोगस आवाजाच्या माध्यमातून होणारी फसवणूक शोधण्यासाठी उपकरण तयार करण्याचाही पथकाचा प्रयत्न सुरु असल्याचे  सह प्राध्यापक सुब्रमण्यम यांनी सांगितले.

डिपफेक शोध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने थेट प्रसारण सुरु असलेल्या आभासी बैठकीतील अवैध सहभागींना हुडकून काढणारे फेकबस्टर हे पहिले सॉफ्टवेयर व्यासपीठ असल्याचा दावा या पथकाने केला आहे. या उपकरणाची आधीच चाचणी यशस्वी झाली असून लवकरच ते बाजारात यश मिळवेल असेही ते म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अदानींनी खरेदी केली ही कंपनी; मोजले एवढे कोटी रुपये

Next Post

तौते चक्रीवादळात ओएनजीसीची जहाजे अडकण्याच्या घटनेची होणार चौकशी

India Darpan

Next Post
संग्रहित छायाचित्र

तौते चक्रीवादळात ओएनजीसीची जहाजे अडकण्याच्या घटनेची होणार चौकशी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
Screenshot 20250623 163319 Facebook

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

जून 23, 2025
Audi India Q7 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 23, 2025
Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011