नवी दिल्ली – देशभरात बनावट लशीच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर बनावट लस कशी ओळखावी, याबाबतच्या काही मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांसाठी जारी केल्या आहेत. बनावट लशी रोखण्याचा तसेच लस उत्पादक आणि देखरेख करणा-या पथकांना बनावट कोविड लशीची ओळख पटविण्यासाठी सक्षम करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. अग्नेय आशिया आणि अफ्रिकेच्या काही भागांमध्ये बनावट लशीचे डोस उपलब्ध झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर सरकारने जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशांतर्गत सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक लशीचे डोस दिले जात आहेत.
अतिरिक्त सचिव मनोहर अगनानी यांनी दोन सप्टेंबरला सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.
या आहे मार्गदर्शक सूचना –
१) ख-या कोविशिल्ड लशीच्या कुपीवर गडद हिरव्या रंगाने एसआयआय उत्पादनाचे लेबल शेड, ट्रेडमार्कसह ब्रँडचे नाव आणि गडद हिरव्या रंगाची अॅल्युमिनअम फ्लिप ऑफ सील असेल.
२) लेबलच्या चिटकवलेल्या भागावर एसआयआय लोगो एका कोनावर छापलेला असतो. ही माहिती काही जाणकारांनाच असते. तेच खरी ओळख पटवू शकतात.
३) अक्षरे अधिक स्पष्ट आणि वाचण्यायोग्य असण्यासाठी विशेष पांढ-या शाईने छापले जाते. निकषांनुसार, संपूर्ण लेबल एका विशिष्ट पद्धतीने बनिवण्यात आला आहे. तो एका विशिष्ट कोनावर दिसून येतो.
४) कोवॅक्सिन लेबलमध्ये नक्कलविरोधी सुविधेमधील अदृश्य यूव्ही हेलिक्सचा (डीएनएसारखी संरचना) समावेश आहे. हे फक्त यूव्ही लाइटमध्येच पाहता येते.