इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बलात्कार, हत्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम संदर्भात अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. राम रहीम हा गुपचूप पॅरोलवर जेल बाहेर आला होता. परंतु नंतर पुन्हा तुरुंगात गेलाच नाही. तर त्याच्याजागी बनावट म्हणजेच तोतया राम रहीम तुरुंगात असल्याची माहिती उजेडात आली आहे.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात एक वेगळीच याचिका दाखल करण्यात आली आहे की, रोहतक तुरुंगात असलेला गुरमीत राम रहीम हा खोटा आहे, तो खरा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत सिंग नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मूळ डेरा प्रमुखाचे अपहरण करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
चंदीगडचे रहिवासी अशोक कुमार आणि डेराच्या सुमारे १२ अनुयायांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. डेराच्या गादीवर बसण्यासाठी मूळ डेरा प्रमुखाचे अपहरण करून हत्या करण्यात आली किंवा त्याला ठार मारले जाईल, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेनुसार, याचिकाकर्ता व इतर अनुयायांना डेरा प्रमुखाच्या व्यक्तिमत्त्वात झालेले विविध बदल लक्षात आले. उंची एक इंच वाढली होती, बोटांची लांबी आणि पायाचा आकारही वाढला होता.
इतकेच नव्हे सध्याच्या पॅरोल कालावधीत कथित डेरा प्रमुख किंवा डमी व्यक्तीने प्रकाशित केलेले व्हिडिओ आणि छायाचित्रे पाहिल्यावर स्पष्टपणे दिसून आले की त्याच्या चेहऱ्यावर आणि हातावर मेकओव्हर किंवा मास्क होता जो व्हिडिओवरून लक्षात येते. तसेच खरा राम रहीम कुठे आहे याची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी याचिकाकर्त्यांनी मागणी केली आहे. न्यायमूर्ती करमजीत सिंग यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे.
त्याचप्रमाणे याचिकाकर्त्यांचा असा देखील आरोप आहे की, खर्या प्रमुखाचे अपहरण झाल्यानंतर बनावट तुरुंगात टाकण्यात आले असून, नकली खऱ्याचे करून प्रमुखपद बळकावण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप डेराच्या अनुयायांनी केला. काही दिवसांपूर्वी तुरुंगात असलेल्या राम रहीमला त्यांचे मित्र भेटले होते जे त्याला ओळखू शकत नव्हते. कथित राम रहीमचे हावभाव खऱ्यांच्या तुलनेत खूप वेगळे होते.
रहीम बनावट असल्याचा दावा करणारी याचिका पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. हा दावा डेरा प्रमुखाचा अनुयायी अशोक कुमार आणि अन्य १८ जणांनी केला असून या याचिकेत हरियाणा सरकार, हनीप्रीत आणि डेराचे प्रशासक पीआर नैन यांना पक्षकार बनवण्यात आले. राम रहीमच्या सत्यतेची सविस्तर चौकशी व्हावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.
Fake Ram Rahim in Jail petition filed in High court