बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बनावट इनपूट टॅक्स क्रेडीट्सचे जाळे उद्ध्वस्त; स्टील कंपनीच्या मालकाला अटक

नवी मुंबईच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाकडून 10.68 कोटी रुपयांचे

by India Darpan
फेब्रुवारी 5, 2022 | 5:06 am
in संमिश्र वार्ता
0
gst 1

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवी मुंबईच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाने तब्बल 10 कोटी 68 लाख रुपयांचे बनावट इनपूट टॅक्स क्रेडीट्सचे जाळे उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणी मेसर्स नवनीत स्टील्स (GSTIN: 27AEXPD3871K1ZV) च्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. कंपनीने 60 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या तयार करून त्यावर बनावट इनपूट टॅक्स क्रेडीट्सच मिळवून त्याआधारे सरकारची आर्थिक फसवणूक केली आहे.

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाच्या हेराफेरीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीवर चौकशी कारवाई केली. ही कंपनी अल्युमिनियम व स्टील या धातूंचा कच्चा माल व तयार मालाच्या व्यापारात आहे, असे या कंपनीच्या मालकाने जबाबात म्हटले आहे. तपासांतर्गत या करदात्याने वेगवेगळ्या अस्तित्वात नसलेल्या/खोट्या कंपन्यांकडून बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट्स मिळवून त्या मंजूर करून घेतल्याचे आढळून आले. आरोपीला केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा-2017 च्या कलम 69 (1) अंतर्गत अटक करण्यात आल आणि त्याच्यावर सदर कायद्याच्या कलम 132 (1) (b) &(c) अन्वये गुन्हा दाखल करुन वाशी, बेलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर व केंद्रीय अबकारी कर कार्यालय, नवी मुंबईचे आयुक्त प्रभात कुमार यांनी ही माहिती दिली.

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालय, मुंबई यांनी फसवणूक करणारे व करचोरांविरूध्द चालवलेल्या हेराफेरीविरोधी मोहिमेचा हा एक भाग होता. अशा व्यक्ती सरकारी तिजोरीचे नुकसान करत प्रामाणिक करदात्यांना असमान स्पर्धा निर्माण करतात. या मोहिमेचा भाग म्हणून नवी मुंबई आयुक्तालयाने नुकतेच 425 कोटींची करचोरी उघडकीस आणली, 20 कोटी रुपयांची वसूली केली आणि 11 जणांना अटक केली आहे.

करचुकव्यांचा छडा लावण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग माहिती विश्लेषणाचा उपयोग करतो. ही माहिती विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण याआधारे मुंबई विभागाच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिकाऱ्यांनी गेल्या पाच महिन्यांमध्ये 625 करचोरी प्रकरणांचा शोध लावला आणि 5500 कोटी रुपयांची करचोरी पकडली आहे तसेच 48 जणांना अटक केली आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग फसवेगिरी आणि करचोरांविरुद्धची मोहिम तीव्र करणार आहे. त्यामुळे येत्या काळात प्रामाणिक करदात्यांना असमान स्पर्धेला सामोरे जावे लागणार नाही तसेच सरकारला आपल्या हक्काचा महसूल मिळेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा आठवड्याचा शेवटचा दिवस; वाचा, शनिवारचे राशिभविष्य

Next Post

मराठी संशोधन मंडळाचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण (विशेष लेख)

India Darpan

Next Post
IMG 20220204 WA0010

मराठी संशोधन मंडळाचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण (विशेष लेख)

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011