इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहिल्यानगरमध्ये बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात आली. तर काही कामे अद्याप सुरु आहे. ग्रामविकास विभागाच्या २५/१५ या योजनेअंतर्गत विकासकामांचे बनावट शासन निर्णय समोर आल्यामुळे ही खळबळ निर्माण झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, नगर आणि नेवासा या चार तालुक्यातील तब्बल ४५ विकासकामांसाठी हे बनावट शासन निर्णय जोडण्यात आले आहे. यापैकी काही कामे पूर्ण झाले आहे.
गेल्यावर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू केली. त्यावेळी अगोदरच सर्वच शासकीय विभागांमार्फत हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांना घाईघाईत मंजुरी देण्यात आली. या गोंधळाचा फायदा घेऊन ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयाची नक्कल करुन बनावट शासन निर्णय तयार करण्यात आले. त्यातून अनेक विकास कामांना मंजूरी मिळवून ते करण्यात आले.