रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक… बनावट पॅथॉलॉजी लॅबचे रॅकेट उघडकीस… मुक्त विद्यापीठापर्यंत लोण…

by India Darpan
ऑगस्ट 11, 2023 | 5:21 am
in संमिश्र वार्ता
0
fir


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट कागदपत्राच्या साहाय्याने पॅथॉलॉजी लॅब सुरु करणा-या राज्यस्तरीय रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात चार एजंट विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या तपासासाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना होणार आहे. मुक्त विद्यापीठाच्या सतर्कतेमुळे हे रॅकेट उघडकीस आले. या प्रकरणात मुक्त विद्यापीठाच्या चौकशी समितीने २० विद्यार्थ्यांना कायदेशीर नोटीस पाठवून बनावट कागदपत्रे कोणाकडून घेतली याबाबतीत चौकशी सुरु केली. त्यानंतर १४ जणांच्या चौकशीत चार जणांची नावे आली आहे.

गुन्हा दाखल झालेल्या चार जणांमध्ये नागपूरचा गौरव शिरसकर (नागपूर), रमेश होनामोरे (सातारा), अशोक सोनवणे (अहमदनगर) आणि संजय नायर (नांदगाव) यांचा समावेश आहे. २०२०-२१ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या २० विद्यार्थ्यांनी पॅथॉलॉजी लॅब सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे बीएससी एमएलटी आणि डीएमएलटी या पदव्यांचे मुक्त विद्यापिठाच्या नावाचे बनावट मार्कशीट, सर्टिफिकेट तयार केले होते. त्यानंतर लॅब सुरु करण्याची मान्यता घेण्यासाठी पॅरामेडिकल काउन्सिलकडे अर्ज केला होता. या अर्जासोबत जोडलेली कागदपत्र बनावट असल्याचा संशय आल्यामुळे पॅरामेडिकल कॅालेजने पडताळणीसाठी मुक्त विद्यापीठाकाडे विचारण केली व त्यानंतर हा भांडाफोड झाला.

त्रिसदस्यीय चौकशी समिती
पॅरामेडिकल काउन्सिलने मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे विचारणा केल्यानंतर हे विद्यार्थी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतं नसल्याचे समोर आले. यानंतर मुक्त विद्यापीठाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून चौकशी केली असता विद्यापीठचे बनावट सही, शिक्के याच्या माध्यमातून बनावट गुणपत्रक, प्रमाणपत्रक तयार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर ही कारवाई सुरु झाली. आता पोलिसांचा तपासात विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या नावाचे सही, शिक्के संशयित एजंटपर्यंत कसे पोहचले, विद्यापीठातील कोणी या कारस्थानात गुंतले आहे का हे बघितले जाणार आहे.

fake certificate pathology lab racket burst crime
ycmou open university nashik

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अधिक (पुरुषोत्तम) मास पोथी अध्याय २५वा… अक्षय्य सौंदर्य म्हणजे काय… व्हिडिओ

Next Post

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांविरूद्ध करा आता ‘व्हॉट्सॲप’वर तक्रार… हा घ्या नंबर…

Next Post
auto rikshaw fair e1675523676901

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांविरूद्ध करा आता ‘व्हॉट्सॲप’वर तक्रार... हा घ्या नंबर...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011