मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तब्बल 20.79 कोटींची खोटी बिले देऊन शासनाची 5.12 कोटी रुपयांचा महसूल बुडविणे एका कंपनी मालकाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी मे. वानकल ट्रेडर्सचा मालक मोहन राजकुमार जांगीड, वय-36 याला अटक करण्यात आली आहे. तशी माहिती महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
महानगर दंडाधिकारी यांनी मोहन राजकुमार जांगीड यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईत अन्वेषण – अ, मुंबईचे राज्यकर सहआयुक्त राहुल द्विवेदी, राज्यकर उपायुक्त निळकंठ घोगरे, सहायक राज्यकर आयुक्त योगेश मनाळ, संतोष कुमार राजपूत सहभागी झाले होते. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करचोरीप्रकरणी 20 जणांना अटक केली आहे.