नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-पुणे रेल्वे आणि निओ मेट्रो या दोन प्रकल्पांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महत्त्वाचे विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज नाशिकमध्ये झाली. या बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांना फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.
फडणवीस त्यांच्या मार्गदर्शनात म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत वेगाने प्रगती करीत आहे. विकास हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपल्या सर्वांना मार्गक्रमण करायचे आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कुठल्या विकास कामांसाठी किती निधी दिला आहे, त्याचे काय परिणाम होणार आहे याबाबत त्यांनी माहिती दिली. तर, नाशिकच्या विकासप्रकल्पांबाबतही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा शेतकऱ्यांना सुद्धा मोठा लाभ होईल. हा मार्ग एक नवा आर्थिक कॉरिडॉर असेल.
नाशिकमध्ये नियो मेट्रो सुद्धा होणार आहे. लवकरच हा निर्णय सुद्धा झालेला दिसेल, अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
https://twitter.com/Devendra_Office/status/1624401801444483076?s=20&t=6-U8joNzZm5N3co4Jx2FPw
Devendra Fadnavis on Nashik Pune High Speed Railway and Neo Metro
BJP Meeting