इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभेच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत महायुतीने २८८ पैकी २१९ जागेवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी ५२ जागेवर आघाडी घेतली आहे. इतर १८ जागेवर आघाडीवर आहे. या विजयानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं !
महायुतीत भाजप १२५, शिवसेना शिंदे गट ५५, अजित पवार गट ३९ जागेवर आघाडी आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस १९, ठाकरे गट २०, राष्ट्रवादी शरद पवार गट १२ जागेवर आघाडीवर आहे. एकुण कल बघता महायुतीची सरशी विधानसभा निवडणुकीत झाली असून त्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होईल हे निश्चित असून त्यात देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळणार आहे. तर शिंदे गट व अजित पवार गटाला उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. पण, विधासभेत महाविकास आघाडी अपयशी ठरली.