विशेष प्रतिनिधी, पुणे
कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी सध्या घराघरात गरम पाणी पिण्याला प्राधान्य दिले जात आहे. गरम पाण्यामुळे तोंड किंवा घशातील कोरोना विषाणू नष्ट होण्याच्या हेतूने हा उपचार केला जात आहे. मात्र, यात कुठलेच तथ्य नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. सध्या अनेक बाबी प्रचलित झाल्या आहेत. मात्र, त्याची शहानिशा करण्यासाठी केंद्र सरकारने फॅक्ट चेक नावाची मोहिम सुरू केली आहे. त्याअंतर्गतच गरम पाणी पिण्याच्या प्रकाराबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. गरम पाण्याने कोरोना नष्ट होत नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
https://twitter.com/mygovindia/status/1390929963654598656