विशेष प्रतिनिधी, पुणे
कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच त्यावर लसीकरणा सह अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत, मात्र काही लोक घरगुती उपायांचा प्रयोग देखील करून पाहत आहेत, त्यातच अनेक उपायांचे प्रत्यक्षिक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चहा प्यायल्याने कोरोना होत नाही, असे म्हटले जाते. नेमके खरे काय आहे हे जाणून घेऊ या…
कोरोनापासूून आपल्याला मास्क, लस, औषधे आणि सोशल डिस्टन्सिंग हेच वाचवू शकतात. मात्र कोरोनापासून वाचण्यासाठी लोक काही घरगुती उपाय करत आहे. सोशल मीडियावर काही गोष्टी चांगले व खात्रीचे उपाय असल्याचे सांगून पसरविल्या जात आहेत. विशेष म्हणजे काही लोक त्यावर विश्वास ठेवत आहे. यापैकीच एक गोष्ट म्हणजे जास्त चहा प्यायल्याने कोरोना होत नाही, असे सांगण्यात असून सोशल मीडियावर त्यासंबंधीच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत.
या मॅसेज मध्ये असे म्हटले आहे की, ‘खूप चहा प्या आणि पाजा, चहा पिणाऱ्यांसाठी खूशखबर’ कारण चहा पिणारे कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहू शकतात. काही लोक सोशल मीडियावर असा देखील दावा करत आहेत की, चीनच्या रुग्णालयांनी कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णांना दिवसातून तीन वेळा चहा देण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा देखील झाल्याचे सांगितले जात आहे.
एकीकडे असे म्हटले जात आहे की, चीनमधील कोरोना विषाणू संदर्भात विशेषज्ज्ञ त्यांच्या मृत्यूआधी सांगून गेले की, जे केमिकल कोरोना विषाणूला मारू शकतात. ते तीनही केमिकल आपल्या चहामध्ये आढळून येतात. मात्र दुसरी कडे केंद्र सरकारकडून ‘पीआयबी ‘ या फॅक्ट चेकच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा दावा फेटाळण्यात आला आहे. या दाव्यामागे कोणते ही वैज्ञानिक प्रमाण नाही. चहामुळे कोरोनाच्या संक्रमणाचा धोका कमी केला जाऊ शकतो, असे सिद्ध झाले नाही त्यामुळे सोशल मीडियावरील अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही आवाहन करण्यात आले आहे.
एक ख़बर में दावा किया जा रहा है कि चाय पीने से #कोरोनावायरस के संक्रमण को रोका जा सकता है और इससे संक्रमित व्यक्ति जल्दी स्वस्थ भी हो सकता है।#PIBFactCheck: यह दावा #फर्जी है। इसका कोई वैज्ञानिक प्रमाण नहीं है कि चाय के सेवन से #COVID19 के संक्रमण का खतरा कम किया जा सकता है। pic.twitter.com/Xsg38RD9YD
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 9, 2021