नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पैसा हा परमेश्वर नाही, परंतु परमेश्वरांपेक्षाही कमी नाही असे म्हटले जाते. कारण आजच्या काळात विशेषतः महागाईच्या काळात आपल्याला जागोजागी पैशाची गरज भासते. त्यामुळे पैसे नसेल तर आपण अडचण भागविण्यासाठी आपली गरज अथवा अडचण भागविण्यासाठी कर्ज काढतो. विशेषतः गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज असे कर्जाचे प्रकार आहेत. तसेच सरकारकडून देखील गोरगरिबांना आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना कर्ज देण्यात येते. मात्र सध्या एक मेसेज सर्वत्र तुफान व्हायरल होत असून सरकार केवळ आधार कार्डवर कर्ज देते, असे म्हटले जाते. परंतु हे खरे आहे का ? हे जाणून घेणे गरजेचे आहे.
आज प्रत्येक गोष्टीसाठी पैसा महत्त्वाचा झाला आहे. कोणतीही वस्तू खरेदी करायची असल्यास पैसे मोजावे लागतात. मात्र, अनेकदा केवळ नोकरीतून मिळणाऱ्या पगारात खर्च भागत नाही. अशा स्थितीमध्ये अनेकजण कर्जाने पैसे घेतात. बँका, सावकार अथवा सोने गहाण ठेवून प्रामुख्याने कर्ज घेतले जाते. अलीकडे बँकांनी पर्सनल लोन घेण्याची पद्धत खूपच सोपी केली आहे. त्यामुळे काही ठराविक कागदपत्रं दिल्यानंतर तुम्हाला सहज पर्सनल लोन मिळते.
सोशल मीडियावर अनेक नवनवीन गोष्टी या सातत्याने व्हायरल होत असतात. असाच एक मेसेज सध्या तुफान व्हायरल होत आहे. मोदी सरकार तरुण आणि बेरोजगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. कर्ज देण्यासाठी सरकारने मुद्रा कर्ज योजना आधीच सुरू केली आहे, ज्यामध्ये तरुणांना त्यांचा रोजगार सुरू करण्यासाठी कमी दरात कर्ज दिले जात आहे. पण आता व्हायरल होत असलेल्या मेसेजबाबत सरकारने लोकांना अलर्ट केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मेसेजमध्ये केंद्र सरकार सर्व नागरिकांना त्यांच्या आधार कार्डवर 4.78 लाख रुपयांचे कर्ज देत असल्याचा दावा केला जात आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे ते या कर्जासाठी अर्ज करू शकतात. यापूर्वी एका व्हायरल मेसेजमध्ये असाही दावा केला जात होता की, बेरोजगार तरुणांना सरकार 6,000 रुपये भत्ता देत आहे आणि त्याची नोंदणीही सुरू झाली आहे.
पोस्टचे फॅक्ट चेकनंतर पीआयबीच्या वतीने ट्विट करून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हा दावा पूर्णपणे बोगस असून सरकारकडून असे कोणतेही कर्ज दिले जात नाही, असे पीआयबीने म्हटले आहे. PIB ने लोकांनी असे मेसेज शेअर करू नका असा सल्लाही दिला आहे.
याबाबत पीआयबीने म्हटले आहे की, फसवणूक करणारे नागरिक अशा प्रकारची फसवणूक करून त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करतात, जेणेकरून त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करणे सोपे होते. अनेक बँका आधारद्वारे वैयक्तिक कर्ज देतात. आधार हे तुमचे प्राथमिक ओळखपत्र मानले जाते आणि अशा कर्जासाठी कोणतेही तारण भरावे लागणार नाही. मात्र केवायसी केल्यानंतर, बँका पगार स्लिप किंवा इतर कागदपत्रांशिवाय आधारद्वारे एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देतात. मात्र कर्ज मिळणे पूर्णपणे तुमच्या चांगल्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. जर तुमचा CIBIL स्कोर 700 च्या वर असेल तर तुम्हाला कर्ज सहज मिळेल.
Fact Check Aadhar Card 5 Lakh Loan Modi Government
Viral Message Alert Cyber Crime Fake