अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मेटाची मालकी असलेल्या फेसबुक प्लॅटफॉर्मवर युझर्सच्या सुरक्षेसाठी एक फिचर आणण्यात आले होते. फेसबुक प्रोटेक्ट म्हणून हे फिचर ओळखले जाते. फेसबुकने आता पुन्हा या फिचरवर प्रकाश टाकला आहे. फेसबुकचे म्हणणे आहे की फेसबुकवर युझर्सच्या सुरक्षेसाठी हे फिचर अतिशय महत्त्वाचे ठरते आहे. त्यामुळे फेसबुक वापरताना अकाऊंटची सुरक्षितता अबाधित राहत आहे. हे फीचर खास अशा लोकांसाठी आणले गेले आहे जे हॅकर्सचे लक्ष्य बनू शकतात. यामध्ये पत्रकार, सरकारी कर्मचारी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांसारख्या लोकांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, फेसबुकने फेसबुक प्रोटेक्ट फीचरला पडताळणीच्या टप्प्यातून बाहेर काढून जागतिक स्तरावर सर्वांसाठी खुले केले. विशेष म्हणजे, हे फेसबुक प्रोटेक्ट फिचर वापरणं आता अनिवार्य होणार आहे. जे फेसबुक प्रोटेक्ट चालू करणार नाही, त्यांचे अकाऊंट बंद होण्याचीही शक्यता आहे. काही काळापूर्वी मेटा या कंपनीने फेसबुक प्रोटेक्ट चालू करण्यासाठी युझर्सला मेलदेखील पाठवले होते. परंतु बहुतेक युझर्सनी हा मेल स्पॅम समजून त्याकडे दुर्लक्ष केले. अशा युझर्सचे फेसबुक अकाउंट बंद करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, जेव्हा युझर्स फेसबुक प्रोटेक्ट फीचर चालू करतील तेव्हाच ही खाती सक्रिय होतील.
फेसबुक प्रोटेक्ट कसे चालू करावे
– तुम्ही फेसबुक प्रोटेक्ट चालू केले नसेल, तर तुम्ही काही स्टेप्स फॉलो करून ते सक्रिय करू शकता.
– युझर्सने सर्वात आधी फेसबुक अकाऊंटच्या सेटिंगमध्ये जावे.
– तिथे तुम्हाला सुरक्षा आणि लॉगिनचा पर्याय मिळेल.
– त्यावर टॅप केल्यानंतर तुम्हाला लिस्टमध्ये फेसबुक प्रोटेक्ट दिसेल.
– त्यावर क्लिक करून, तुम्ही स्क्रीनवर दिलेले पर्यायांची निवड करत फिचर चालू करता येईल.
– अशा प्रकारे तुमचे फेसबुक प्रोटेक्ट फीचर चालू होईल.
– त्यानंतर फेसबुक अकाऊंट वापरण्यात कोणतीही अडचण येणार नाही.