नवी दिल्ली – जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या सध्या फेसबुकच्या माध्यमातून जोडली गेली आहे आहे. फेसबुकवर मोठ्या प्रमाणात फोटो आणि माहिती शेअर होत असते. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर शेअर करू नयेत. जर असे घडल्यास फेसबुक अकाउंट ब्लॉक होऊ शकते.
सरसकट कोणतीही माहिती वजा पोस्ट शेअर करत असाल तर फेसबुक अकाउंट कायमचे बंद होऊ शकते. दारूगोळा, बंदूक खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आल्याचे फेसबुकने याआधीच जाहीर केले आहे. या गोष्टींशी संबंधित एखादी पोस्ट शेअर केल्यास फेसबुक अकाउंट ब्लॉक होऊ शकते. त्याचप्रमाणे हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे किंवा कोणत्याही प्रकारे धमकावणारे मेसेज आणि पोस्ट शेअर केल्यास फेसबुक कडून अकाउंट तत्काळ बंद केले जाते.
एखाद्या व्यक्तीवर किंवा जागेवर हिंसाचार करण्याच्या हेतूने वक्तव्ये करणे धोक्याचे ठरत असल्याने यापासून सावध राहावे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच पैशांची मागणी करणे किंवा एखाद्या विशिष्ट शस्त्राचा उल्लेख करणे देखील धोक्यात आणू शकते त्यामुळे अशा आशयाचे मेसेज न करण्याचे स्पष्ट संकेत तज्ज्ञांनी दिले आहे.
काहीवेळा गमतीत पोक हा पर्याय निडून एखाद्याला पोक केल्यास फेसबुक अकाउंट त्वरित बंद केले जाते. त्याचप्रमाणे दहशतवादी कारवायांसाठी देखील अनेक वेळा मेसेज येत असतात, अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडण्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. कोणतीही राजकीय, धार्मिक पोस्ट देखील तुम्हाला अडचणीत आणू शकते. त्यामुळे फेसबुकवर काहीही सर्च करतांना आपले अकाउंट ब्लॉक होणार नाही याची काळजी घ्या.