अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
फेसबुक रिल्सचे जागतिक प्रक्षेपण करण्यात आले आहे. शॉर्ट व्हिडिओ फीचर असलेले फेसबुक रिलचे जगभरातील सुमारे दीडशे देशांमध्ये अस्तित्वात आले आहे. अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांना या फिचरचा आनंद घेता येणार आहे. फेसबुक रिल पहिल्यांदा २०२०मध्ये टीकटॉकसोबतच्या स्पर्धेत लाँच करण्यात आली होती. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणाले की, फेसबुक रिल निर्मात्यांना पैसे कमविण्याची संधी देईल. यासाठी फेसबुक लवकरच एक नवीन फीचर आणणार आहे. Meta द्वारे फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी Reels Play प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. जे वापरकर्त्यांना रिल शेअर करून कमाई करण्याची संधी देणार असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यांच्या रिल्सला ३० दिवसांत कमीतकमी १००० व्ह्यूज मिळतील त्या युजर्सना फेसबुक बोनस देईल. Metaने सांगितले की Reels Play बोनस प्रोग्राम कंपनीच्या १ बिलियन डॉलर क्रिएटर्स गुंतवणुकीचा एक भाग आहे. या कार्यक्रमांतर्गत, रिल्स बनवणारे दर महिन्याला जास्तीत जास्त ३५ हजार डॉलर कमवू शकतील.
मेटानुसार, फेसबुक रिलच्या मध्यभागी जाहिराती दाखवल्या जातील, ज्या बॅनर आणि स्टिकर्सच्या स्वरूपात असतील. तसेच लवकरच पूर्ण स्क्रीनभर जाहिरातीदेखील रिल्समध्ये प्रदर्शित केल्या जातील. फेसबुक यातून कमाई करेल. या कमाईचा काही भाग फेसबुक रिल्स बनवणाऱ्या निर्मात्यांना देईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तसेच फेसबुक स्टोरीजच्या जागी फेसबुक रिल लाँच केली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
फेसबुकच्या रिलमध्ये विविध अपडेट्स देण्यात येणार आहेत. यामध्ये एडिटिंग, शेअरिंग व्यतिरिक्त यूजर्सना व्हिडिओ रिमिक्स करण्याचा पर्याय दिला जाईल. फेसबुक ६० सेकंदांचे छोटे व्हिडिओ रिल बनवू शकणार आहे. नवीन अपडेटनंतर, रिल वापरकर्त्यांना ड्राफ्ट पर्याय आणि सेव्ह ड्राफ्ट बटण दिले जाऊ शकते. याशिवाय व्हिडीओ क्लिपिंग फीचर दिले जाऊ शकते. जे वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये व्हिडिओ प्रकाशित करण्यास मदत करेल.