सॅन फ्रांसिस्को – सॅन फ्रांसिस्को येथील सन व्हॅलीत जुलै २०१९ मध्ये अॅपलचे टिमोथी डी कूक (टिम कूक) आणि फेबसबुकचे मार्क झुकरबर्ग यांच्यात बैठक होऊन आपसातील बिघडलेले संबंध सुधारण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. त्या काळात कँब्रिज अँनालिटिका घोटाळ्यामु ळे फेसबुकला अमेरिकी संसद, नियामक संस्था आणि कूक यांच्यासह अनेक मोठ्या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते.
फेसबुकने जवळपास ५ कोटी अमेरिकी मतदारांची माहिती घेऊन ती अप्रत्यक्षरित्या निवडणुका प्रभावित करणारी कंपनी अँनालिटिकाला दिली होती. घोटाळ्याला कशा प्रकारे हाताळावे, असा झुकरबर्ग यांनी बैठकीत विचारले होते. तेव्हा फेसबुक वगळता कंपनीशी निगडित सर्व अॅपमधून लोकांचा डाटा डिलिट केला असता, असे उत्तर कूक यांनी दिले होते. हे उत्तर ऐकून झुकरबर्ग स्तब्ध झाले होते.
लोकांच्या खासगी माहितीतीवरच फेसबुकचा व्यवसाय चालतो. त्यावरूनच त्यांना जाहिराती मिळतात. फेसबुक कंपनी वार्षिक ७ हजार कोटी डॉलर कमवते. फेसबुकचा व्यवसायाला हादरा बसला आहे, असे कूक यांनी म्हटले होते. आज दोन वर्षांनंतर दोघांनीही एकमेकांविरोधात खुले युद्ध छेडले आहे.याच आठवड्यात सोमवारी आयफोनमध्ये नवे प्रायव्हसी फिचर लाँच झाले आहे. यामध्ये आयफोन युजर्सच्या परवानगीनंतरच फेसबुक आणि त्यासारख्या अॅप युजर्सना ट्रॅक करू शकणार आहे. युजर्सना ट्रॅक करणे हाच जाहिरातीचा कणा आहे.
फेसबुकसारख्या तांत्रिक कंपन्या डिजिटल जाहिरातींसाठी लोकांच्या ऑनलाइन सवयींना ट्रॅक करून त्याचा अभ्यास करतात. त्याच आधारावर त्यांना टार्गेटेड जाहिराती पाठवते. सध्याच्या अंदाजानुसार, अॅपलच्या या नव्या फिचरमुळे जास्तीत जास्त लोक फेसबुकची ही ट्रॅकिंग यंत्रणा रोखू शकणार आहे.
कूक आणि झुकरबर्ग यांच्यामधील संबध इतके बिघडले आहेत की, अँपलचे सहसंस्थापक स्टिव्ह जॉब्स यांच्यासोबत मार्क झुकरबर्ग जेवण आणि फिरण्यासाठी गेलेले आहेत. गुगलचे संस्थापक लॅरी पेज यांची कूक यांच्याशी नियमित भेट होते. परंतु झुकरबर्ग आणि कूक यांची अनौपचारिक भेट होत नाही.










