नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पायाभूत सुविधा विकासन क्षेत्रात देशभर लौकिक असलेल्या अशोका बिल्डकॉन लिमिटेडची किर्तीध्वजा इतर अनेक देशात पोहचली आहे. देशांतर्गत अनेक राज्यांत बडे प्रकल्प पूर्णत्वास नेणाऱ्या या समूहाने मालदीवज, गयाना, बांगलादेश आणि बेनीन या देशांतही पायाभूत सुविधा विकासानातून चांगला जम बसवला आहे. याच लौकिकाच्या औत्सुक्यातून परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी समूहाच्या गयानास्थित प्रकल्पास भेट दिली. याप्रसंगी अशोका समूहाच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना डॉ. एस. जयशंकर अक्षरशः भारावले. ‘या सर्वांचा उत्साह इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा वाटला, असे ट्वीट त्यांनी भेटीनंतर केले.
अशोका बिल्डकॉन लिमिटेडच्या वतीने गयाना येथे ईस्ट बँक- ईस्ट कोस्ट रोड लिंकेज प्रोजेक्ट ( ओगले ते हाग्ज बॉश, एक्लीज) प्रकल्प निर्माणाधीन आहे. गयाना दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. अशोका बिल्डकॉनचे मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ) आदित्य पारख यांनी मंत्री महोदयांचे स्वागत करून त्यांना प्रकल्पाची साद्यंत माहिती दिली. प्रकल्प उभारणीच्या काळात सामोरे जाव्या लागलेल्या आव्हानांपासून ते नागरिकांना त्यापासून होणाऱ्या लाभांबाबत पारख यांनी डॉ. एस. जयशंकर यांना अवगत केले. याप्रसंगी अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
‘ जागतिक पायाभूत वास्तव भारतातून निर्गमित होतेय ही आनंदाची बाब आहे. गयानातील निर्माणाधीन प्रकल्प निर्मितीत गुंतलेल्या अशोका समूहाच्या चमूचा उत्साह इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा वाटला. मी स्वतः त्यामुळे प्रभावित झालो आहे.’ -• डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री, भारत सरकार फोटो कॅप्शन : अशोका बिल्डकॉन लिमिटेडच्या वतीने गयाना येथील ईस्ट बँक- ईस्ट कोस्ट रोड लिंकेज प्रोजेक्ट ( ओगले ते हाग्ज बॉश, एक्लीज) या निर्माणाधीन प्रकल्पाला परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी प्रकल्पाची माहिती देताना अशोका बिल्डकॉनचे मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ) आदित्य पारख. समवेत इतर वरिष्ठ अधिकारी.
https://twitter.com/DrSJaishankar/status/1649950189749190657?s=20
External Affairs Minister Visit Ashoka Buildcon Gayana Project