गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ : विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम

by India Darpan
सप्टेंबर 14, 2024 | 7:44 pm
in स्थानिक बातम्या
0
gedam

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल विभागामार्फत राज्य ई-पीक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतक-यांना आपला पीक पेरा स्वतः नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या नोंदणीची मुदत रविवार पर्यंत (दि. १५ सप्टेंबर) होती. मात्र, अद्यापही काही शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲप द्वारे पीक पेरा नोंदविला नसल्याने शेतकऱ्यांना नोंदणीसाठी २३ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी दिली. नाशिक विभागातील सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगामात केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी ॲपद्वारे पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

खरीप हंगाम २०२४-२५ करिता शेतकरी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्यासाठी महसूल दिनापासून (१ ऑगस्ट, २०२४) सुरुवात झाली. दि. १५ सप्टेंबर पर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करता येणार होती. परंतू, राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी विहीत मुदतीत पूर्ण झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने राज्य शासनाने शेतकरी स्तरावरील या नोंदणीसाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी कळविले आहे.

खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये दि. १३ सप्टेंबर पर्यंत नाशिक विभागात १५ लाख ४८ हजार ६२२ हेक्टर इतक्या क्षेत्रावरील ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. तर जवळपास १६ लाख ४७ हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर पीक पाहणी नोंदविण्यात आलेली नाही. राज्य शासनाने “माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा” च्या उद्देशाने स्वतः च्या शेताची पीक पाहणी स्वतः करण्याची संधी ई पीक पाहणी ॲपद्वारे राज्यातील सर्व शेतक-यांना उपलब्ध करून दिली आहे. पीक विमा, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे तसेच भूसंपादन इ. करिता ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पीक पाहणी नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी केले आहे.

ई-पीक पाहणी करण्यामध्ये काही समस्या असल्यास 02025712712 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करुन मदत घेता येऊ शकते. इंटरनेटची आवश्यकता फक्त शेतकरी नोंदणी वा पिक पाहणी अपलोड करणेकामी आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतामध्ये इंटरनेट सुविधा नाही, त्याठिकाणी सुद्धा पीक पाहणी करता येते.

सहाय्यक/तलाठी स्तरावरील पिक पाहणी नोंदविण्यासाठी देखील सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून आता दि.२४ सप्टेंबर ते २३ नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत सहाय्यक/तलाठी पीक पाहणी नोंदवू शकतात, असेही त्यांनी कळविले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ

Next Post

केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी घेतले श्री गणेश दर्शन

Next Post
varsha3 e1726323689781 876x420 1

केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी घेतले श्री गणेश दर्शन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011