शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देशाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशां’कात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर… हे राज्य पहिल्या स्थानी…

by India Darpan
जुलै 18, 2023 | 4:42 pm
in राष्ट्रीय
0
F1TRysGaEAEwfaK e1689678652238

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीति आयोगाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशांक-2022’ अहवालात 78.20 गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे.तर तामिळनाडू राज्याने पहिले स्थान मिळवले आहे. देशाच्या निर्यात क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या आधारावर, नीति आयोगाचे उपाध्‍यक्ष सुमन बेरी यांनी ‘निर्यात सज्जता निर्देशांक (Export Preparedness Index ) 2022’ अहवाल जारी केला.

        ‘निर्यात सज्जता निर्देशांक (Export Preparedness Index ) 2022 ची तिसरी आवृत्तीत चार प्रमुख व 11 उपमानकांच्या आधारे महाराष्ट्र राज्य 78.20 गुण मिळवत दुसरे स्थानावर राहिले आहे, तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आणि कर्नाटक राज्य तिस-या  क्रमांकवर राहिले आहे.

काय आहे निर्यातविषयक सज्जता निर्देशांक?
हा अहवाल म्हणजे भारताच्या निर्यातविषयक कामगिरीचे समावेशक विश्लेषण आहे. देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना त्यांच्या सहकारी राज्यांच्या तुलनेत स्वतःच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे आणि उपराष्ट्रीय स्तरावरील निर्यातीवर आधारित विकासाला चालना देण्यासाठी उत्तम धोरणात्मक यंत्रणा विकसित करण्याच्या संभाव्य आव्हानांचे विश्लेषण करणे, यासाठी या निर्देशांकाचा वापर करण्यात येतो. निर्यातविषयक सज्जता निर्देशांक पुढील चार मुख्य घटकांच्या संदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांची क्रमवारी निश्चित करतो – धोरण, व्यवसाय परिसंस्था, निर्यात परिसंस्था आणि निर्यातविषयक कामगिरी. तसेच या क्रमवारीसाठी निर्यात प्रोत्साहन धोरण, संस्थात्मक चौकट, व्यवसायाचे वातावरण, पायाभूत सुविधा, वाहतुकीची सुविधा, अर्थसहाय्य मिळण्याची सोय, निर्यातविषयक पायाभूत सुविधा, व्यापारविषयक मदत, संशोधन आणि विकासविषयक पायाभूत सुविधा, निर्यातीचे वैविध्यीकरण आणि विकासाभिमुखता हा 11 उपनिर्देशक विचारात घेतले जातात.

ईपीआय 2022 च्या अहवालात महाराष्ट्र राज्याने सर्व श्रेणींमध्ये निर्यात सज्जता निर्देशांकात उत्तम कामगिरी बजावली आहे. तसेच बहुतांश ‘तटवर्ती राज्यांनी चांगली कामगिरी केली असून, तमिळनाडू (80.89), कर्नाटक (76.36) आणि गुजरात (73.22) गुणांसह ही राज्ये देखील सर्व श्रेणींमध्ये निर्यात सज्जता निर्देशांकात अग्रगण्य स्थानावर आहेत. अहवाचा उद्देश देशातील सर्व राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये निरोगी स्पर्धाची भावना निर्माण करणे आणि राज्यांमध्ये समतुल्य- शिक्षणाला प्रात्साहन देणे हा आहे.

नीति आयोगाचे उपाध्यक्ष, सुमन बेरी यांनी अहवालाचे प्रकाशन करताना सांगितले की, “आपण 2047 कडे पाहत असताना आणि तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत असताना, उत्पादनासोबत सेवा आणि कृषी निर्यातीत स्पर्धात्मकता वाढवण्यावर भर देणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.

Tamil Nadu ranks no 1 in export preparedness index. pic.twitter.com/6muu395gGP

— Salem Dharanidharan (@dharanisalem) July 18, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चक्क दाम्पत्याला ठरविले भूताळा-डाकीण… त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Next Post

सिडकोत पादचाऱ्याच्या हातातून मोबाईल हिसकावला तर नाशिक पोलिसांकडून अवैध दारु विक्रीचा पर्दाफाश

Next Post
crime 6

सिडकोत पादचाऱ्याच्या हातातून मोबाईल हिसकावला तर नाशिक पोलिसांकडून अवैध दारु विक्रीचा पर्दाफाश

ताज्या बातम्या

jail11

अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा चोर गजाआड…१० गुन्ह्याची कबुली, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

मे 9, 2025
LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
8 2

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट…हे आहे कारण

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, ९ मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
Screenshot 20250508 204411 Facebook 1

नाशिक महानगरपालिका पाणीवापराचे थेट स्पॉट बिलिंग देणार…या एजन्सीची नियुक्ती

मे 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011