नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२१ सत्राच्या सर्व पदव्युत्तर विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा सुरळीत सुरु आहेत. या परीक्षांना सोमवार १६ ऑगस्ट पासुन प्रारंभ करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२१ सत्रातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, परिचर्या, भौतिकोपचारशास्त्र, व्यवसायोपचारशास्त्र, भाषा श्रवणदोष विज्ञानशास्त्र आदी अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षेस नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे.
या परीक्षांसाठी एकूण ३,८८८ विद्यार्थी प्रविष्ट झाालेले आहेत. याशिवाय एम.बी.बी.एस. अंतिम वर्ष व प्रथम वर्ष एम.बी.बी.एस. जुना अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षांचा यात समावेश आहे. जुन्या अभ्याक्रमातील परीक्षेसाठी ३७४ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. सदरील परीक्षा हया राज्यातील विविध ५७ परीक्षा केद्रांवर आयोजित करण्यात आलेल्या आहेत. लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेत प्रत्येक पेपरनंतर एक दिवसाचा खंड देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-19 संदर्भात शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करणेबाबत तसेच परीक्षा केंद्र निजर्तुंकीकरण करणेबाबत विद्यापीठाकडून आदेशित करण्यात आले आहे. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाÚयांनी परीक्षेच्या दरम्यान मुखपट्टीचा वापर, वैयक्तिक अंतर राखणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. सदरील लेखी परीक्षेच्या दरम्यान परीक्षा केद्रंावर सी.सी.टी.व्हि. यंत्रणेद्वारे विद्यापीठाकडून निरीक्षण करण्यात येत आहे.
कोविड-19 संदर्भात परिस्थिती लक्षात घेऊन लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचे जलदरितीने निकाल प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रभारी कुलगुरु डॉ. नितिन करमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यापीठाचे उपकुलसचिव महेंद्र कोठावदे, सहायक कुलसचिव प्रमोद पाटील, डॉ. संतोष कोकाटे, दिपक वि. सांगळे, श्रीमती योगिता पाटील, श्रीमती शिल्पा पवार, श्रीमती सविता पाटील, संदिप महाजन, संदिप नंदन, श्रीमती अनुपमा पाटील, मुकुंदा मुळे यांनी परिश्रम घेतले आहेत.