इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – माजी केंद्रीय मंत्री आणि गुजरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांना त्यांची पत्नी रेश्मा पटेल हिने एका तरुणीसह रंगेहात पकडले. शिवाय त्यांच्या या कृत्यावर संतापून त्यांना मारलंदेखील. या प्रकरणामुळे सोळंकी चांगलेच चर्चेत आले आहे. पतीच्या कृत्यामुळे काँग्रेसचीही बदनामी होत आहे. तरीही पक्षाचे हायकमांड गप्प असल्याचे रेश्मा सांगतात.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री माधव सिंह सोळंकी यांचा मुलगा भरत सिंह याचा पत्नी रेश्मा पटेलसोबत वाद सुरू आहे. दोघेही वेगळे राहतात. काल संध्याकाळी रेश्माने भरत सिंहला एका तरुणीसोबत पाहिले आणि त्यांच्या पाठोपाठ आनंदच्या आश्रय बंगल्यावर गेली. पत्नी रेश्माला दारात पाहून भरतसिंग भडकले आणि त्यांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, रेश्माने बंगल्यात उपस्थित असलेल्या एका तरुणीला पकडले आणि सोळंकीसोबत आपले आयुष्य वाया घालवू नको, असा सल्लाही तिला दिला. ही मुलगी देखील काँग्रेस कार्यकर्त्याची मुलगी असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओही इंटरनेट मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रेश्माने आपल्या पतीवर व्यभिचारी असल्याचा आरोप करत त्याचे अनेक महिलांशी संबंध असल्याचे सांगितले.
https://twitter.com/dhaval8456/status/1531925186915622913?s=20&t=3t2cBc6NLyr9MMSuwTQ3oA
भरत सिंहला घटस्फोट आणि रेश्माला पतीसोबत
रेश्माने सांगितले की, भरत सिंहला तिला घटस्फोट घ्यायचा आहे, पण तरीही तिला सर्वकाही विसरून पतीसोबत राहायचे आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार तिला राहण्यासाठी घर मिळाले आहे, पण तिचा पती कोणताही खर्च देत नाही, असा आरोप तिने केला आहे. रेश्माचा आरोप आहे की, भरत सिंहने त्याचं प्रेमप्रकरण असलेल्या मुलीला बंगला आणि कार दिली आहे, नाहीतर तिची आर्थिक परिस्थिती ती आलिशान बंगला घेऊ शकेल अशी नाही.
रेश्माने आपल्या पतीच्या गैरकृत्याची तक्रार काँग्रेस हायकमांडकडे केली होती. मात्र अद्याप तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांच्या वाईट चारित्र्यामुळे काँग्रेस पक्ष त्रस्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी पाटीदार महिला नेत्या वंदना पटेल यांनीही भरत सिंह यांच्यावर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला होता. वंदना या भरत सिंह यांची पत्नी रेश्मा यांच्या बाजूने होत्या, त्यामुळे त्यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले.