मुंबई – देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधन वार्तेने सोशल मिडियात अफवांचा पूर आला आहे. मात्र, डॉ. सिंग यांची प्रकृती स्थिर असून हळूहळू सुधारणा होत असल्याचे एम्स अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. सिंग यांच्या नावाने एका रुग्णाचा फोटोही सोशल मिडियात पोस्ट केला जात आहे. तसेच, डॉ. सिंग यांचा जुना फोटो टाकून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. तसेच, आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनीही डॉ. सिंग यांच्यासोबतचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. सोशल मिडियात सरसकटपणे श्रद्धांजली वाहिली जात असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग यांचे वय सध्या ८८ वर्षे आहे. त्यांच्यावर दोनदा बायपास शस्त्रक्रीया झाली आहे. तसेच, त्यांना मधुमेहाचाही त्रास आहे. काँग्रेसच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. डॉ. सिंग यांची प्रकृती स्थिर आणि हळूहळू सुधारत आहे. सोशल मिडियातील अफवांच्या पोस्टपैकी एक अशी