पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटात गेलेले माजी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंतांच्या यांच्या गाडीवर कात्रज चौकात हल्ला झाला. त्यानंतर आता त्यांनी यासंदर्भात त्यांची प्रतिक्रीया दिली आहे. सामंत यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ते म्हणाले की, कालमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पुणे दौऱ्यात असताना माझ्यावर काही व्यक्तींकडून भ्याड हल्ला करण्यात आला. वैचारिक मतभेत असू शकतात. मात्र,अशाप्रकारे हल्ले करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती-संस्कार नाही.अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणार ही नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
काल मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पुणे दौऱ्यात असताना माझ्यावर काही व्यक्तींकडून भ्याड हल्ला करण्यात आला. वैचारिक मतभेत असू शकतात मात्र,अशाप्रकारे हल्ले करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती-संस्कार नाही.अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणार ही नाही.
— Uday Samant (@samant_uday) August 3, 2022
या हल्ल्यात गाडीतील जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे दोघे एकाच दिवशी पुणे दौऱ्यावर असतांना हा हल्ला झाला. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री हे पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार होते. यासाठी उदय सामंत हे देखील दगडूशेठ गणपतीच्या दिशेने जात होते. त्यावेळी हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी उदय सामंतांच्या गाडीचा ताफा बघितला आणि त्यानंतर त्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यात गाडीची काच फोडण्यात आली.
Ex Minister Uday Samant Reaction after Car Attack