मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांचे धाकटे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात अनिल परब यांचीबी चौकशी झाली होती. त्यात सदानंद कदम यांच्या नावाचा उल्लेख काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी घेतले होते, हे उल्लेखनीय.
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. काही महिन्यांपूर्वी त्यांनी वाहिन्यांना मुलाखत देताना ठाकरेंवर गंभीर आरोपही केले होते. त्यामुळे आता त्यांचे धाकटे बंधू सदानंद कदम सुद्धा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र तसे झाले नाही.
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या आरोपांनंतर अनिल परब यांची साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. याच आरोपांमध्ये सोमय्यांनी सदानंद कदम यांच्याही नावाचा उल्लेख केला होता. त्यानुसार आज ईडीने त्यांना रत्नागिरीतील कुडोशी येथे असलेल्या त्यांच्या फार्महाऊसवरून ताब्यात घेतले. ईडीची टीम त्यांना घेऊन मुंबईला रवाना झाली आहे. दापोली तालुक्यातील मुरडमध्ये असलेल्या साई रिसॉर्टच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
सुडबुद्धीने कारवाई
काही दिवसांपूर्वी खेड येथे उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेचे यश संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. त्याचाच सुड उगवण्यासाठी ईडीच्या माध्यमातून सदानंद कदम यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप, ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे. ठाकरे गटाचे आणखी एक नेते संजय कदम यांनी देखील ही कारवाई सुडबुद्धीतून करण्यात आल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना चुकीच्या पद्धतीने वापरण्याचा वाईट पायंडा पाडला जात असल्याचेही विरोधापक्षातील नेत्यांनी म्हटले आहे.
#Dapoli #SaiResort Scam #SadanandKadam Arrested (Anil Parab's Partner)
ab
Kya Hoga Tera #anilparab @BJP4India @Dev_Fadnavis @mieknathshinde
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) March 10, 2023
EX Minister Ramdas Kadam Brother Sadanand ED Detained
Dapoli Resort Case