बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला आहे. यासंदर्भात त्यांच्या कार्यालयानेच माहिती दिली आहे. मुंडे यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून मुंडे हे परळीकडे जाते होते. मध्यरात्री१२.३० वाजण्याच्या सुमारास मुंडे यांच्या कारला परळी शहरात अपघात झाला. वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून, काळजी करण्यासारखे काही नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री12.30 वाजण्याच्या सुमारास@dhananjay_munde साहेबांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे.साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे
— OfficeofDM (@OfficeofDM) January 4, 2023
दरम्यान, थोड्याच वेळात मुंडे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलविले जाणार आहे. परळी येथून विशेष हेलिकॉप्टरने त्यांना नेले जाणार आहे.
Ex Minister Dhananjay Munde Injured in Car Accident
Politics NCP Road Parali Beed