मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने दणका दिला आहे. देशमुख यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. याच अंतर्गत देशमुख हे गेल्या ४ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. आता तरी जामीन मिळावा, अशी मागणी करणारी याचिका पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली.
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केला होता की देशमुख यांनी १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते. त्यानंतर याप्रकरणी देशमुख यांची चौकशी सुरू झाली. देशमुख हे आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणात सहभागी असल्याचे आतापर्यंतच्या पुराव्यात दिसते आहे. तसेच, आता तरी त्यांना जामीन देण्याचा विचार होऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे देशमुख हे आणखी किती काळ तुरुंगात राहतील, हे सांगणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.
#Breaking : Special PMLA Court denies bail to former Mahrashtra Home Minister and NCP leader #AnilDeshmukh in a money laundering case being investigated by ED.
Deshmukh is in custody since November 2, 2021. @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/qSu1ZzWCOc
— Live Law (@LiveLawIndia) March 14, 2022