बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांना चौकशीचे समन्स; हे आहे प्रकरण

by Gautam Sancheti
एप्रिल 21, 2023 | 10:07 pm
in राष्ट्रीय
0
satyapal malik

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना विमा घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहे. मलिक यांनीच याबाबत माहिती दिली आहे. माझ्याकडून नोंदवलेल्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करू इच्छिते, असे ते म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय तपास यंत्रणेने माजी राज्यपालांना २७ आणि २८ एप्रिल रोजी त्यांच्या अकबर रोड गेस्टहाऊसवर हजर राहण्यास सांगितले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेने जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआयने त्यांना समन्स बजावले आहे. या प्रकरणाबाबत माजी गव्हर्नर मलिक यांनी दावा केला होता की, त्यांना दोन फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी 300 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.

वास्तविक, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि मेघालयचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दावा केला होता की, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना आपल्याला 300 कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती. ‘अंबानी’ आणि ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्ती’ या दोन फायली क्लिअर करण्याच्या बदल्यात ही ऑफर दिली जाणार होती, परंतु त्यांनी हा करार रद्द केला. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना सांगितले की, त्यावेळी पंतप्रधानांनी त्यांना भ्रष्टाचाराशी तडजोड करू नका असे सांगितले होते. त्यांच्या दाव्याची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची शिफारस जम्मू-काश्मीर प्रशासनाने केंद्र सरकारकडे केली होती. ज्याला आता केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

https://twitter.com/Satyapalmalik_/status/1649417728518660098?s=20

१७ ऑक्टोबर २०२१ रोजी राजस्थानच्या झुंझुनू येथे एका कार्यक्रमात सत्यपाल मलिक म्हणाले होते की, ‘काश्मीरला गेल्यानंतर माझ्याकडे दोन फाइल्स आल्या. एक अंबानींची फाइल होती आणि दुसरी आरएसएसशी संबंधित असलेल्या व्यक्तीची होती जी मेहबुबा मुफ्ती आणि भाजपच्या मागील आघाडी सरकारमध्ये मंत्री होती. ते पंतप्रधान मोदींच्याही जवळचे होते. त्यात घोटाळा झाल्याची माहिती मला सचिवांनी दिली आणि त्यानंतर मी दोन्ही करार रद्द केले. दोन्ही फायलींसाठी प्रत्येकी १५० कोटी रुपये दिले जातील, असे सचिवांनी मला सांगितले. पण, मी त्यांना सांगितले की मी पाच कुर्ता-पायजामा घेऊन आलो आहे आणि तेच घेऊन निघणार आहे.

Ex Governor Satyapal Malik CBI Summons

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा अक्षय तृतीयेचा दिवस; जाणून घ्या, शनिवार, २२ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

Next Post

‘….तर खडसेंचे जावई आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाहीत’, शरद पवार असे का म्हणाले?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Sharad Pawar e1682095791922

'....तर खडसेंचे जावई आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाहीत', शरद पवार असे का म्हणाले?

ताज्या बातम्या

Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011