नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुलवामा हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट करणारे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्याच्या चर्चा आहेत. दिल्ली पोलिसांनी मलिक यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींना आरकेपुरम पोलिस ठाण्यात रोखले आहे. मात्र, मलिक यांच्या अटकेचा दक्षिण-पश्चिम विभागाचे पोलिस उपायुक्तांनी इन्कार केला आहे.
मलिक यांच्या डझनभर समर्थकांनाही पोलिस ठाण्यात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी रात्री 12 वाजता माजी राज्यपालांना पोलिस ठाण्यात आणताच अनेक राज्यांतील खाप पंचायतींचे प्रतिनिधी पोलिस ठाण्याबाहेर जमा होऊ लागले. कोणत्याही अनुचित परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दल CRPF तैनात करण्यात आले आहे.
सत्यपाल मलिक यांचा सन्मान करण्यासाठी हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील खाप प्रतिनिधी सेंट्रल पार्क, सेक्टर-12, आरके पुरम येथे जमले होते. सत्यपाल मलिक तेथे पोहोचताच दिल्ली पोलिसांनी त्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखले. अखेर तेथेच शेतकरी प्रतिनिधींनी तंबू टाकला. खाप प्रतिनिधींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. ते सामानही इकडे तिकडे विखुरले होते. उद्यानातील कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
डीसीपी दक्षिण-पश्चिम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यपाल मलिक यांचा मुलगा आणि मुलगी आरके पुरम भागात राहतात. सत्यपाल मलिक गर्दीसोबत पार्कमध्ये बैठक घेत होते, त्यामुळे पोलिसांनी त्यांना सार्वजनिक ठिकाणी सभेला परवानगी आहे का, असे विचारले असता त्यांनी नाही म्हटले, त्यानंतर सत्यपाल मलिक त्यांच्या गाडीतून पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी त्यांना बोलावले नाही किंवा ताब्यात घेतले नाही.
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे CRPF च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. सत्यपाल मलिक हे त्यावेळी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. आपल्या मुलाखतीत ते म्हणाले की, पंतप्रधानांकडे काश्मीरबाबत चुकीची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या हलगर्जीपणामुळे, फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामामध्ये जवानांवर जीवघेणा हल्ला झाला होता, मला (सत्यपाल मलिक) याबद्दल बोलण्यास मनाई करण्यात आली होती. सीआरपीएफने विमानाची मागणी केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने विमान देण्यास नकार दिला. रस्त्यावर प्रभावी सुरक्षा व्यवस्था नव्हती.
सत्यपाल मलिक यांच्या मते, हा हल्ला गृह मंत्रालयाच्या ‘अकार्यक्षमता आणि निष्काळजीपणा’चा परिणाम आहे. त्यावेळी राजनाथ सिंह गृहमंत्री होते. या सर्व त्रुटी त्यांनी पंतप्रधानांसमोर मांडल्याचे मलिक म्हणाले. पुलवामा हल्ल्यावेळी पंतप्रधान कॉर्बेट पार्कमध्ये होते. याबाबत पंतप्रधानांशी बोलले असता त्यांनी याबाबत मौन बाळगण्यास सांगितले होते आणि कोणालाही सांगू नका असे सांगितले होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही त्यांना गप्प राहण्यास सांगितले. त्यांना लगेच लक्षात आले की पाकिस्तानवर दोष द्यायचा आणि सरकार आणि भाजपला निवडणुकीत फायदा मिळवायचा होता.
https://twitter.com/AnilJat4972/status/1649674159109345280?s=20
Ex Governor Satyapal Malik Arrested Delhi Police