नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ने दंड थोपटले आहे. तर, इंडिया या नावाखाली विरोधक एकवटले आहेत. राजकीय हालचाली गतिमान झाल्या असतानाच जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान पद टिकवण्यासाठी काय करू शकतात याबाबत मोदींचे एकेकाळी निकटवर्तीय राहिलेल्या आणि जम्मू-काश्मीर व गोव्याचे राज्यपाल पद भूषविलेल्या सत्यपाल मालिकांचे खळबळजनक दावे असलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पुलवामा हल्ल्याबाबतही त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. २०१९ची निवडणूक जिंकण्यासाठी पुलवामा हल्ला घडविण्यात आला. आता २०२४मध्ये मोदी काय काय करणार हे मलिक यांनी सांगितले आहे.
बघा त्यांचा हा व्हिडिओ