इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेमाला वय, वेळ किंवा कसलेही बंधन नसते असे म्हणतात. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू अरूण लाल लवकरच दुसऱ्यांदा विवाहबद्ध होणार आहेत. त्यांच्याशी लग्न होणाऱ्या वधूचे नाव बुलबुल आहे. विशेष म्हणजे, बुलबुल ही अरूण लाल यांच्यापेक्षा २८ वर्षांनी वयाने लहान आहे. सध्या अरुण लाल यांचे वय ६६ वर्षे आहे.
अरुण लाल आणि बुलबुल हे अनेक वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. मैत्री आणि पुढे विवाह असा प्रवास झाला. महिन्याभरापासून साखरपुडा झाला आणि आता अरूण लाल विवाहाच्या पत्रिका वाटपात मग्शुल आहेत. २ मे रोजी कोलकत्ता येथे पीयरलेस इन हॉटेलमध्ये हा विवाह पार पडणार आहे. अरूण लाल आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रीना यांच्यात सहमतीने घटस्फोट झाला होता. १९५५ मध्ये उत्तरप्रदेशात जन्माला आलेल्या अरूण लाल यांनी बंगालकडून क्रिकेट खेळले. सध्या ते बंगाल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. १६ कसोटी आणि १३ एकदिवशीर आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या अरूण लाल यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५३ सामने खेळताना ३० शतके केली आहेत.