मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

माजी क्रिकेटपटू इरफान पठाणची नाशकात येऊन उत्तुंग षटकारांची आतषबाजी

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 24, 2023 | 7:26 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230224 WA0016 e1677246829878

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ध्येय निश्चित असेल आणि आपली परिश्रम घेण्याची तयारी असेल तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ध्येय पक्के करा आणि ते साध्य करण्यासाठी कष्ट करत राहा असे उद्गार भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने काढले. ते एसएमबीटी क्रिकेट कार्निव्हलच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी एसएमबीटी सेवाभावी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ हर्षल तांबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या शैक्षणिक संकूलात ‘एसएमबीटी फेस्ट २०२३’ या वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि २४) पासून या फेस्टची सुरुवात झाली आहे. फेस्टची सुरुवात विविध प्रकारच्या खेळांनी झाली आहे. या फेस्टचे आयोजन शनिवार दिनांक ४ मार्चपर्यंत आहे. यादरम्यान साहित्य, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट संचलित एसएमबीटी आयएमएस अॅण्ड आरसी मेडिकल कॉलेज, एसएमबीटी आयुर्वेद कॉलेज, एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी, डेन्टल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी कॉलेज ऑफ नर्सिंग, एसएमबीटी हॉस्पिटल यांचा संयुक्त वार्षिकोत्सव एसएमबीटी ट्रस्टच्या धामनगाव, घोटी कॅम्पसमध्ये दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.

गेली दोन वर्षे करोना प्रादुर्भावामुळे हा फेस्ट होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे यंदाच्या फेस्टची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. आज (दि २४) रोजी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू एसएमबीटी कॅम्पसमध्ये येताच मोठा जल्लोष विद्यार्थ्यांनी केला.
सुरुवातील कॉफी विथ इरफान हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला इरफानने हजेरी लावली. यानंतर एसएमबीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील क्रिकेट मैदानावर क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन त्याच्या हस्ते झाले. यावेळी, तब्बल २२ क्रिकेट टीमच्या सदस्यांसोबत इरफानने हस्तांदोलन केले. यांनतर ग्राउंडवर उपस्थित विद्यार्थ्यानादेखील इरफान पठाणकडून सरप्राईज देण्यात आले.

दुसरीकडे, हिरवा शालू पसरलेले मैदान पाहून इरफानने बॅट हातात घेत उत्तुंग षटकारांची आतषबाजी केली. यावेळी मैदानाबाहेर जमलेल्या प्रेक्षकांनी एकाच जल्लोष केला. आजवर अनेक कार्यक्रमांना मी गेलो परंतु सर्वाधिक हस्तांदोलन मी एसएमबीटीमध्ये केले असून येथील परीसर आणि नाशिकविषयीचे प्रेम इरफानने यावेळी बोलून दाखवले. सुरुवातीला इरफानने काय मंडळी? कसे आहात? असे मराठीतून वाक्य म्हणत सर्वांनाच अवाक केले.

आजपासून २८ मार्चपर्यंत या क्रीडास्पर्धा होणार आहेत. क्रिकेट कार्निव्हलसोबतच टेबल टेनिस, महिलांसाठी क्रिकेट, व्हॉलीबॉल, कॅरम, फुटबॉल बास्केटबॉल, चेसदेखील आनंद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. यावेळी संस्थेचे बोर्ड मेंबर श्रीराम कुऱ्हे, अधिष्ठाता डॉ मीनल मोहगावकर, प्राचार्य डॉ. प्रदीप भाबड, प्राचार्य डॉ योगेश उशीर, किरण जगताप, प्राचार्या जोन्हा कोठारे, चीफ ऑफिसर मयूर रावल यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

क्रिकेट कार्निव्हल असते दरवर्षी आकर्षण
या सामन्यासाठी तब्बल २२ वेगवेगळ्या टीम आहे. प्रत्येक टीममध्ये १५-१७ खेळाडू असून तब्बल एसएमबीटी परिवारातील ६०० पेक्षा अधिक सदस्यांचा यात सक्रीय सहभाग आहे. दरवर्षी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी या सामन्यांचे आयोजन केले जाते. आचार विचारांची देवाण-घेवाण यानिमित्ताने होत असते.

पहिल्यांदाच डे-नाईट सामने
क्रिकेट म्हटलं की सर्वांच्याच आवडीचा खेळ. यंदा पहिल्यांदाच एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्या शैक्षिणिक संकुलातील क्रिकेट सामने डे-नाईट स्वरुपात होत आहेत. हिरवा शालू पांघरलेल्या मैदानात दिवस रात्र सामने खेळवली जात असल्यामुळे अनोख्या प्रयोगामुळे सर्वदूर कौतुक होत आहे. येथील क्रिकेट सामन्यांचे अतिशय नियोजनबद्ध आयोजन झाले असून मैदानदेखील आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या धर्तीवर सजविण्यात आले आहे.

Ex Cricketer Irfan Pathan Nashik Cricket Play

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

छ्तांवरील सौरऊर्जा निर्मितीसाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार; ७९,५६४ ग्राहकांची संख्या, १३८७ मेगावॅट वीजनिर्मिती

Next Post

औरंगाबाद नव्हे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद नव्हे ‘धाराशिव’! नामांतराला केंद्राची मंजुरी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

G04fkJmWIAATyZA e1758000093714
संमिश्र वार्ता

अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती…अमोल मिटकरींनी डिवचलं तर रोहित पवारांनी केले कौतुक

सप्टेंबर 16, 2025
cbi
भविष्य दर्पण

सीबीआयने या माजी मंत्र्यांच्या बहिणी, मेहुण्या, पीएच्या जागेवर १६ ठिकाणी टाकले छापे…मिळाले हे घबाड

सप्टेंबर 16, 2025
income
संमिश्र वार्ता

ITR- प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ…इन्कम टॅक्स भरणा-यांना दिलासा

सप्टेंबर 16, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

रेल्वेच्या ऑनलाइन आरक्षित तिकीट बुक करण्याच्या नियमात १ ऑक्टोबरपासून होणार बदल

सप्टेंबर 16, 2025
Untitled 22
संमिश्र वार्ता

नाशिकहून एअरलिफ्ट करण्यासाठी हॅलिकॉप्टर…बीडमध्ये बचाव कार्याला गती

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची भाडे आकारणी बंधनकारक…बघा, शासनाचा निर्णय

सप्टेंबर 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आर्थिक स्थिती आनंद देईल, जाणून घ्या,मंगळवार, १६ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Next Post
aurangabad

औरंगाबाद नव्हे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबाद नव्हे 'धाराशिव'! नामांतराला केंद्राची मंजुरी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011