मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक व्हेईकल ब्रँड, ईव्हीट्रिक मोटर्सने, ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो सेंटर येथे आयोजित ईव्ही इंडिया एक्सपो २०२२मध्ये दोन इलेक्ट्रिक स्कूटर्स- ईव्हीट्रिक राईड एचएस आणि ईव्हीट्रिक मायटी प्रो चे लाँच केले. या ब्रँडने, ईव्ही एक्स्पोच्या प्रतिष्ठित मंचावर अनेक नेत्रदीपक ऑफर सादर केल्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज मोहक डिझाइनसाठी अभ्यागतांकडून प्रचंड प्रशंसा मिळवली.
डिस्प्लेच्या या श्रेणीने, ईव्हीच्या क्षेत्रात, स्पष्टपणे उत्कृषपणाची मर्यादा उंचावली कारण त्याद्वारे उत्कृष्ट तंत्रज्ञान अंमलबजावणीसह शैलीच्या प्रकारची जोडणी केली गेली. ही उत्पादने, हेवी वेट आणि सुपर बिल्ट-अप गुणवत्तेसह मजबूत आणि रोबोटिक इन-हाऊस चेसिसवर आधारित आहेत. वापरकर्त्यांच्या बॅटरी चार्जिंगच्या गरजा समजून घेऊन, दोन्ही ई-स्कूटर्स, लिथियम-आयन रिमूव्हेबल बॅटरीसह उपलब्ध आहेत.
ईव्हीट्रिक राईड एचएस:
ही हाय-स्पीड ई-स्कूटर, अभिजाततेचे प्रदर्शन करते आणि उच्च कामगिरीसह रायडरला सामर्थ्य देते. ही ई-स्कूटर, एका चार्जवर ५५ कि.मी. प्रतितासाचा सर्वोच्च वेग आणि १२० कि.मी.ची प्रभावशाली श्रेणी प्रदान करते. ती ४ तासांच्या आत पूर्णपणे चार्ज होते. ही ई-स्कूटर, लाल, काळा, पांढरा आणि राखाडी अशा लोकप्रिय रंगांमध्ये उपलब्ध आहे.
ईव्हीट्रिक मायटी प्रो:
ब्रँडची ही हाय-स्पीड स्कूटर, रायडर्सना शैली आणि आराम यांचे मिश्रण प्रदान करते. ती सहजपणे जास्तीत जास्त ६५ कि.मी. प्रतितास वेगापर्यंत पोहोचते आणि एका पूर्ण चार्जवर १२० कि.मी. अंतर कापण्यास सक्षम आहे. स्कूटरला पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात. वापरकर्त्याच्या आवडीनुसार, ती लाल, पांढऱ्या आणि राखाडी रंगात उपलब्ध आहे.
ईव्हीट्रिक मोटर्सचे संस्थापक आणि एमडी, श्री मनोज पाटील यांनी पुष्टी केली की, “भारत हळूहळू बहुप्रतिक्षित ईव्ही क्रांतीचा साक्षीदार होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासाठी भारतीय उत्पादकांकडून अशा कटिबद्ध प्रयत्नांची गरज आहे, जे अनुभवातून येतात आणि मिशनला लक्षणीय गती देण्यासाठी योगदान देऊ शकतात. ईव्हीट्रिकमध्ये ऑटोमेशनच्या क्षेत्रातील बरीचशी संबंधित समज आणि अनुभव आहे ज्यांचा वापर आम्ही, नाविन्यावर प्रयोग करत असताना आणि भारतीय ग्राहकांसाठी दर्जेदार ईव्ही उत्पादने आणत असताना करत आहोत. या ईव्ही एक्स्पोमध्ये आम्ही दोन नवीन उत्पादने लाँच करत आहोत, जी आमच्या ऑफरच्या श्रेणीचा एक उत्कृष्ट विस्तार असेल. ब्रँडने यापूर्वीच राईड, अॅक्सिस, माईटी, राईज, कनेक्ट, राइड प्रो, माईटी प्रो आणि राइड एचएस ही ८ उत्पादने बाजारात आणली आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस, ५०० डीलरशिपपर्यंत पोहोचण्याची त्यांची योजना आहे.”
Evitric High Speed Electric Scooter Launch
Automobile