मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- किया इंडिया या आघाडीच्या मास-प्रीमियम कारमेकर कंपनीने आज त्यांच्या नवीन लाँच करण्यात आलेल्या कॅरेन्स क्लॅव्हिस आणि कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही मॉडेल्ससाठी बुकिंगचा टप्पा पार केल्याची घोषणा केली. या वेईकल्सनी लाँच केल्याच्या चार महिन्यांमध्ये एकत्रित २१,००० हून अधिक युनिट्स बुकिंगचा टप्पा पार केला आहे, ज्यामधून कियाची भारतातील वाढती गती दिसून येते, जेथे नाविन्यपूर्ण उत्पादने वितरित करण्यासाठी कंपनीच्या क्षमतेचे पाठबळ मिळत आहे. नाविन्यपूर्ण उत्पादने कुटुंब-केंद्रित आयसीई ग्राहक आणि ईव्हीचा अवलंब करणाऱ्या पर्यावरणाप्रती जागरूक ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात.
किया इंडियाचे मुख्य विक्री अधिकारी श्री. जून्सू चो म्हणाले, ”आम्हाला आमच्या कॅरेन्स क्लॅव्हिस आणि क्लॅव्हिस ईव्ही मॉडेल्सना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा आनंद होत आहे. या मागणीमधून ग्राहकांचा कियावरील विश्वास दिसून येतो आणि आमच्या वेईकल्समध्ये नाविन्यता, सुरक्षितता व आरामदायीपणा आणण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. आम्हाला अभिमान आहे की, दोन्ही आयसीई व ईव्ही मॉडेल्स भारतातील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात, ज्यासह श्रेणीमधील कियाचे नेतृत्व अधिक दृढ होत आहे.”
अल्पावधीत कॅरेन्स क्लॅव्हिससाठी २०,००० हून अधिक आणि कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीसाठी १००० हून अधिक बुकिंगच्या नोंदीमधून ग्राहक-केंद्रित, नाविन्यता-संचालित ब्रँड म्हणून किया इंडियाचे स्थान अधिक दृढ होते. विभागातील अग्रणी आरामदायीपणा, दर्जात्मक सुरक्षितता, प्रीमियम वैशिष्ट्ये आणि आयसीई व ईव्ही पॉवरट्रेनसमधून निवड करण्याचा पर्याय यांसह कॅरेन्स क्लॅव्हिस श्रेणी भारतातील गतीशीलता ट्रेण्ड्सना नव्या उंचीवर नेण्यामध्ये कियाची स्पर्धात्मक क्षमता प्रबळ करते.
कॅरेन्स क्लॅव्हिस साहसी व जबाबदार ड्रायव्हिंग, स्टाइल व व्यावहारिकता आणि प्रगत तंत्रज्ञानासह प्रबळ मूल्याचे संतुलन असलेल्या वेईकलचा शोध घेणाऱ्या भारतातील आधुनिक कुटुंबांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. एसयूव्हीची ताकद, एमपीव्हीचा आरामदायीपणा आणि फॅमिली कारची वैविध्यतता यांचे संयोजन असलेली ही कार लांबच्या प्रवासासाठी आणि शहरातील दैनंदिन प्रवासासाठी अनुकूल आहे. दुसऱ्या आसन रांगेमध्ये स्लायडिंग, रिक्लायनिंग व वन-टच इलेक्ट्रिक टम्बल सीट्स आणि तिसऱ्या रांगेमध्ये सुलभ उपलब्धतेसाठी श्रेणीमधील पहिले बोस मोड अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह दैनंदिन ड्रायव्हिंगदरम्यान आरामदायीपणामध्ये वाढ करण्यात आली आहे. सर्वांगीण पॅकेजसह या कारमध्ये प्रीमियम, तंत्रज्ञान-अग्रणी केबिनसह इन्फोटेन्मेंट व ड्रायव्हरला माहिती देणारा ड्युअल पॅनोरॅमिक २६.६२ सेमी (१२.३ इंच) डिस्प्ले, बोस ८-स्पीकर सिस्टम, ६४-कलर अॅम्बियण्ट लायटिंग, ड्युअल डॅशकॅम आणि क्लायमेट कंट्रोल/ इन्फोटेन्मेंट स्वॅप स्विच आहे.
कियाची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकल कॅरेन्स क्लॅव्हिस संभाव्य ईव्ही ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. या ईव्हीमध्ये एैसपैस जागा असलेली डिझाइन, सर्वोत्तम वैशिष्ट्ये आणि दैनंदिन ड्रायव्हिंगसाठी स्थिरता आहे, जेथे किफायतशीरपणाबाबत कोणतीच तडजोड करण्यात आलेली नाही. लांब अंतरापर्यंत प्रवास करायचा असो, वीकेण्डला उत्साहपूर्ण ड्रायव्हिंगचा आनंद घ्यायचा असो किंवा दैनंदिन प्रवास करायचा असो ही ईव्ही १७१ पीएस मोटर व २५५ एन टॉर्कसह सुलभ, उत्तम कार्यक्षमता देते. ही सात-आसनी ईव्ही कॅरेन्स क्लॅव्हिस आयसीई मॉडेल सारखाच प्रीमियम अनुभव देते. या ईव्हीमध्ये ६७.६२ सेमी ड्युअल पॅनोरॅमिक डिस्प्ले, ९० कनेक्टेड कार वैशिष्ट्ये आणि सर्वोत्तम कंट्रोल्स आहेत, ज्यामुळे प्रत्येक प्रवास विनासायास व कनेक्टेड असण्याची खात्री मिळते. क्लॅव्हिस ईव्ही दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – ५१.४ केडब्ल्यूएच (एआरएआय-प्रमाणित ४९० किमी रेंज – एमआयडीसी फुल) आणि ४२ केडब्ल्यूएच (एआरएआय-प्रमाणित ४०४ किमी रेंज – एमआयडीसी फुल). ही ईव्ही १०० केडब्ल्यू डीसी चार्जरच्या माध्यमातून फक्त ३९ मिनिटांमध्ये १० टक्के ते ८० टक्क्यांपर्यंत जलदपणे चार्ज होते, ज्यामधून शहरामध्ये व लांब अंतरापर्यंतच्या प्रवासासाठी सोयीसुविधेची खात्री मिळते.
कॅरेन्स क्लॅव्हिस श्रेणीमध्ये सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. दोन्ही आयसीई व ईव्ही व्हेरिएण्ट्समध्ये लेव्हल २ अॅडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टम्स (एडीएएस) आहेत, ज्यामधून २० हून अधिक ऑटोनॉमस सुरक्षितता वैशिष्ट्ये मिळतात. तसेच, सर्वसमावेशक पॅसिव्ह सेफ्टी पॅकेजमध्ये १८ प्रगत वैशिष्ट्ये आहेत, जसे सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, रिअर ऑक्यूपण्ट अलर्ट आणि ३६०० सराऊंड व्ह्यू मॉनिटर यांसह सुरक्षिततेला अधिक प्रबळ करण्यात आले आहे.