मुंबई – तुमच्यापैकी अनेकांना इच्छामृत्यूविषयी थोडेफार माहिती ठाऊक असेल. एखाद्या रुग्णाला जिवंत असताना मृत्यूसारख्याच वेदना होत असतील, तर मृत्यू आलेलाच बरा असे अनेक जण बोलतात. त्यांच्या वेदना पहावल्या जात नाहीत, त्यामागे असा दावा असतो. परंतु प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असल्याने अनेक देशांमध्ये इच्छामृत्यूला मान्यता मिळालेली नाही.
स्वित्झर्लंड सरकारने मात्र आपल्या देशात इच्छामृत्यूला कायदेशीर मान्यता दिली आहे. त्यासाठी संबंधित व्यक्तीला एका मिनिटात वेदनाविरहित मृत्यू दिला जाऊ शकणार आहे. स्वित्झर्लंड सरकारने इच्छामृत्यूसाठी वारण्यात येणार्या मशिनला कायदेशीर मान्यता दिली आहे. इलाज नसलेल्या आजाराशी सामना करणार्या रुग्णांसाठी या मशिनचा वापर केले जाणार आहे.
इंग्रजी भाषेत इच्छामृत्यूला युथनेशिया असे म्हणतात. हा ग्रीक भाषेतील शब्द असून, चांगला मृत्यू असा त्याचा अर्थ होतो. इच्छामृत्यूसाठी तयार करण्यात आलेली मशिन एग्झिट इंटरनॅशनल या कंपनीने तयार केली आहे. डॉ. फिलिप निटस्के हे या कंपनीचे संचालक आहेत. डॉ. फिलिप यांनी ही डेथ मशिन तयार केली असून, ते डॉ. डेथ या नावाने प्रसिद्ध आहेत. दुसरीकडे या मशिनला मंजुरी मिळाल्यानंतर काही नागरिकांनी स्वित्झर्लंड सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या मशिनमुळे आगामी काळात नागरिक आत्महत्या करण्याच प्रवृत्त होतील. इच्छामृत्यूचे दोन प्रकार आहेत. एक युथनेशिया आणि दुसरा पॅसिव्ह युथनेशिया.
अॅक्टव्ह युथनेशिया संबंधित व्यक्तीच्या जीवनाचा अंत थेट वैद्यकीय मदतीने केला जातो. तर पॅसिव्ह युथनेशियामध्ये नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या परवानगीने वैद्यकीय कोमा किंवा गंभीर परिस्थितीत रुग्णाला वाचवण्यार्या जीवरक्षक उपकरणाला हळूहळू बंद केले जाते. अशा प्रकारे रुग्णाचा हळूहळू मृत्यू होतो.
या विशेष मशिनला बनवणार्या संघटनेच्या माहितीनुसार, आम्ही सुसाइड पॉडचे दोन प्रोटोटाइप तयार केले आहेत. त्यांचे नाव सारको असे ठेवण्यात आले आहे. यामध्ये रुग्णाला झोपवून एक बटन दाबले जाते. त्यानंतर मशिनमध्ये नायट्रोजनची पातळी वाढत जाते. २० सेकंदात ऑक्सिजनची पातळी २१ टक्क्याहून १ टक्क्यावर पोहोचते. त्यामुळे रुग्णाचा ५ ते १० मिनिटांच्या आत मृत्यू होतो.
या मशिनला मंजुरी देण्यापूर्वी स्वित्झर्लंडमध्ये आतापर्यंत इच्छामृत्यूची मागणी करणार्या रुग्णांना लिक्विड सोडियम पेंटोबार्बिटलचे इंजेक्शन दिले जात होते. इंजेक्शन दिल्याच्या २ ते ५ मिनिटांनंतर रुग्ण गाढ झोपेत जात होता. त्यानंतर कोमामध्ये गेल्यानंतर रुग्णाचा मृत्यू होत होता. सुसाइड कॅप्सुलच्या मदतीने रुग्णाचा मृत्यू सोप्या पद्धतीने होतो, असे कंपनीचे म्हणणे आहे.