मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला दोन वेळा कास्टिंग काउचचा सामना करावा लागला. एका मुलाखतीत तिने या अनुभवावर खुलेपाणने आपल्या भावना व्यक्त केल्या. चित्रपटसृष्टीच्या बाहेरील कलाकारांना या समस्येला सर्वात जास्त सामोरे जावे लागते. चित्रपट उद्योगाशी संबंधित कुटुंबीयातील मुलांना कास्टिंग काउचचा सामना करावा लागत नाही, असे ईशा गुप्ताने सांगितले.
ईशा आपले अनुभव कथन करताना म्हणाली, की एकदा तिने निर्मात्याला नकार दिल्याने निर्मात्याने तिला चित्रपटाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ईशा गुप्ताने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात इम्रान हाश्मीसोबत जन्नत २ या चित्रपटाद्वारे केली होती. त्यामंतर तर रुस्तुम, पलटन आणि बादशाहों या चित्रपटातही काम केले आहे.
ईशा म्हणाली, की त्या दिवसात मी मेकअप आर्टिस्टसोबत एका खोलीत राहात होते. मी घाबरण्याचे नाटक करून सांगितले होते की मी एकटी झोपू शकणार नाही. परंतु मी तिथे भूताला नव्हे, तर एका व्यक्तीला घाबरत होती. कारण तो तुम्हाला कधी बाहेर काढून देईल हे तुम्हाला ठाऊक नसेल. असे लोक चित्रपटसृष्टीतील मुलांसोबत असे काम करणार नाही. कारण त्यांचे आई-वडील त्यांना मारतील. परंतु आम्हाला काम हवे असते म्हणून ते अशी कामे करतात.
ईशा गुप्ता म्हणाली, की गैरकृत्य करण्यास नकार दिला म्हणून एक निर्माता तिला चित्रपटातून बाहेर काढणार होता. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना मध्येच तो निर्माता आला आणि मला तुझ्यासोबत काम करायचे नाही, असे सांगितले. त्यादरम्यान चार- पाच दिवसांचे चित्रीकरण झालेले होते. मी नकार दिला म्हणून तो मला चित्रपटातून बाहेर काढणार होता. त्यादरम्यान दिग्दर्शकांनी तिला पाठिंबा दिला आणि निर्मात्याला नकार दिला.
ईशा म्हणाली, निर्मात्याने दिग्दर्शकाला सांगितले की ती मला चित्रपटात नकोय, तेव्हा ती इथे का आली? चित्रीकरण सुरू असताना दिग्दर्शक म्हणाले, ती माझी नायिका आहे. दिग्दर्शक माझ्याजवळ आले आणि विचारले, या मुलासोबत असे झाले आहे का? मी त्यांच्याकडे पाहिले, हसले आणि म्हणाले, हो सर. का तो बोलला नाही? त्याने मला आता सांगितले, ईशा चित्रपटात का आहे? तेव्हा मला जाणवले की मी नाही म्हटले म्हणून ते मला काम देण्यास तयार झाले नाही.