नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील इ.एस.डी.एस. सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड या कंपनीला यांना त्यांच्या AI पुढाकारासह कॉम्बॅट कोविडसाठी एजिस ग्रॅहम बेल 2022, हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार सोहळ्याने तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोन्मेषकांना आणि त्यांच्या तंत्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची 12 वी आवृत्ती साजरी केली. इ. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड, भारतातील आघाडीच्या व्यवस्थापित क्लाउड सेवा आणि एंड-टू-एंड मल्टी-क्लाउड पुरवठादारांपैकी एक आहे (स्रोत: केन संशोधन अहवाल). इ. एस. डी. एस. ने विकसित केलेले AA+ चाचणी सोल्यूशन हे AI आधारित चाचणी उपाय आहे, जे क्ष-किरणातून श्वसनाच्या कोणत्याही आजारामुळे फुफ्फुसातील विकृती शोधते. दिल्ली येथे झालेल्या एजिस ग्रॅहम बेल पुरस्कार सोहळ्याद्वारे या तंत्रज्ञानावर आधारित उपायांना पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात आलं.
इ. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष पीयूष सोमाणी, ह्यांनी ह्या क्षणी आपले मत व्यक्त केले, “ही इ. एस. डी. एस साठी खरोखरच सन्मानाची बाब आहे. आम्ही नेहमीच तंत्रज्ञानात अग्र स्थान मिळवण्यासाठी आणि त्याचा सर्वोत्तम वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. या AA+ चाचणी उपायासह, आमच्या संपूर्ण संघानी हा नाविन्यपूर्ण आणि स्मार्ट उपाय विकसित करण्यासाठी समर्पितपणे काम केले आहे आणि आम्हाला आशा आहे की ह्याने सकारात्मक मदत होईल. हे निश्चितपणे इ. एस. डी. एस. मधील प्रत्येकासाठी कठोर परिश्रम करत राहण्यासाठी आणि भविष्यातही अशा नामवंत पुरस्कारांच्या प्राप्तीसाठी उत्साह वाढवणारे आहे.” एजिस स्कूल ऑफ डेटा सायन्स अँड सायबर सिक्युरिटी अँड टेलिकम्युनिकेशनचे सीईओ आणि एजीबीएचे संस्थापक भूपेश दहेरिया म्हणाले, “ए.आय. आणि एम.एलच्या मदतीने IoT, AA+ चाचणी उपाय ही काळाची गरज आहे, ह्या नवकल्पनेबद्दल इ. एस. डी. एस चे अभिनंदन. एका मिनिटापेक्षा कमी वेळात फुफ्फुसांशी संबंधित संक्रमण ओळखणे, अशा प्रकारचे तंत्रज्ञान जास्त लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशासाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आरोग्य सेवा क्षेत्राला रुग्णाच्या फुफ्फुसाची स्थिती त्वरीत हाताळण्यास आणि शोधण्यात मदत होईल.”