नाशिक – ईएसडीएस या भारतातील मॅनेज्ड डेटा सेंटर व क्लाऊड होस्टिंग सेवा पुरवठादार कंपनीने ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांना अनुसरून आणखी एक सेवा प्रस्तुत करत असल्याची घोषणा केली आहे. ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशनचे ‘एनलाईट सीडीएन’ हे सर्वाधिक वेगवान व किमतीचे पुरेपूर मूल्य देणारे कन्टेन्ट डिलिव्हरी नेटवर्क आहे. या सुविधेला ‘एनलाईट डब्ल्यूएएफ’ (वेब ऍप्लिकेशन फायरवॉल) आणि ‘व्हीटीएमस्कॅन’ (वेबसाईट सिक्युरिटी स्कॅनर) यांचे संरक्षण प्राप्त असून याचा विकास भारतातच ईएसडीएसच्या संशोधन व विकास टीमने केला आहे.
‘एनलाईट कन्टेन्ट डिलिव्हरी नेटवर्क (सीडीएन)’च्या साहाय्याने वेबवर आधारीत कन्टेन्ट विजेच्या वेगाने भारतात कुठेही पोहोचवणे सहजशक्य होणार आहे. यासाठी ईएसडीएस आपल्या भारतभर विस्तारलेल्या डेटा सेंटर्सच्या नेटवर्कचा उपयोग करून घेत असून क्लाऊड डेटा सेंटर्समार्फत देशातील आपले स्थान अधिक जास्त व्यापक आणि बळकट करण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.
‘एनलाईट सीडीएन’ची खास वैशिष्ट्ये:
– वेब पोर्टल्स, इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स, न्यूज ऍप्स आणि युजीसी अर्थात युजर-जनरेटेड कन्टेन्टसाठी वापरली जाणारी ऍप्लिकेशन्स यासाठी वेबसाईट ऍक्सिलरेशन. स्थिर / कायम बदलत राहणारा कन्टेन्ट असलेल्या वेबसाईट्सना देखील याची मदत होते आणि एएसपी, झिप व पीएचपी फाईल्सशी संबंधित, अतिशय वेगाने पूर्ण कराव्या लागणाऱ्या विनंत्यांसाठी ही सुविधा अक्षरशः जादूची कांडी फिरवल्यासारखे काम करते.
– फाईल डाउनलोड ऍक्सिलरेशन – डाउनलोडींग क्लायंट्स, गेम्स, स्टोर्समधील ऍप आणि एचटीटीपी किंवा एचटीटीपीएस वर आधारीत डाउनलोड सेवा देणाऱ्या वेबसाईट्ससाठी हे उपयुक्त आहे.
व्हीओडी ऍक्सिलरेशन – ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या वेबसाईट्स, व्हिडिओ शेअरींग वेबसाईट्स, इंटरनेट व्हिडिओ-ऑन-डिमांड प्लॅटफॉर्म्स, ऑन-डिमांड ऑडिओ-व्हिज्युअल ऍप्स व अशा अनेक प्रकारचे व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक ऑन-डिमांड ऑडिओ-व्हिज्युअल सेवा पुरवणाऱ्या ग्राहकांसाठी हे वैशिष्ट्य अतिशय उपयोगी आहे.
संरक्षण सेवा:
ईएसडीएस एनलाईट वेब ऍप्लिकेशन फायरवॉल (डब्ल्यूएएफ) – भारतात विकसित करण्यात आलेले क्लाऊड होस्टेड वेब ऍप्लिकेशन फायरवॉल असून त्यामुळे कंपन्या त्यांच्या वेबसाईट्सवर नको असलेले आणि संभवतः हानिकारक वेब ट्रॅफिक येण्यापासून रोखू शकतात. त्याचबरोबरीने त्यांना ओडब्ल्यूएएसपी सर्वाधिक १० धोक्यांपासून देखील संरक्षण मिळते.
ईएसडीएस व्हीटीएमस्कॅन (वेबसाईट सिक्युरिटी स्कॅनर) – यामुळे कंपन्यांना भरपूर आणि व्यापक संरक्षण अनुभव मिळतो, वेबवरील त्यांच्या उपस्थितीला २४x७ संरक्षण पुरवले जाते. असुरक्षिततेचे प्रभावी व्यवस्थापन करून हॅकर्सना वेबसाईटपासून दूर ठेवले जाते.
—
“ईएसडीएस ही भारतातील आघाडीचे मॅनेज्ड डेटा सेंटर व क्लाऊड होस्टींग सेवा पुरवठादार कंपनी आहे. क्लाऊड आणि डेटा सेंटर यांच्या पुढे जाऊन सीडीएन आणि एंटरप्राइज स्टोरेज यासारख्या, ग्राहकांच्या मागण्या व गरजा लक्षात घेऊन खास तयार करण्यात आलेल्या व्यवसाय सुविधा सादर करताना मला अतिशय अभिमान वाटतो आहे. कोविड-१९ महामारीच्या आव्हानात्मक काळात क्लाऊड उद्योगक्षेत्राच्या संरचनेच्या आकारात आमूलाग्र बदल घडून आले आहेत, आधुनिक सुविधा किफायतशीर दरांमध्ये मिळाव्यात ही लोकांची मागणी जोम धरत आहे, अशा परिस्थितीत आपल्या किमतींचे पुरेपूर मूल्य मिळवून देणाऱ्या, अत्याधुनिक, क्रांतिकारी सुविधा सादर करून ईएसडीएसने भविष्याच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे.”
- पियुष सोमाणी, ईएसडीएसचे संस्थापक, सीएमडी व ग्रुप सीईओ