औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद तथा संभाजीनगर शहराला गेल्या गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, वास्तविक पाहता मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण जायकवाडी (पैठण) नजीक असून ते औरंगाबाद पासून शहरापासून जवळच आहे. भर पावसाळ्यात औरंगाबादकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागली आहे. निमित्त आहे ते चक्क एका उंदराचे. हो उंदरामुळे शहराचा पाणीपुरवठा चक्क बाधित झाला. त्यामुळे त्याची राज्यभरात चर्चा होत आहे.
जायकवाडी धरणातून दोन मोठया जलवाहिनीतून संपूर्ण औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा होतो, परंतु हा पाणीपुरवठा कधी नियमितपणे दररोज होत नाही. तर कधी तीन दिवसात तर कधी पाच-सहा दिवसानंतर होत असतो, सध्याही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे शहरातील अनेक नागरिक बॅरल मधून विकत पाणी घेतात. गोरगरीब जनता मात्र नळाला पाणी येईल याची आठवडाभर वाट पाहत बसतात, परंतु काल अचानकपणे औरंगाबाद ( संभाजीनगर ) वासियांना पाणीपुरवठा च्या दिवस असताना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आणि याला कारण म्हणजे एक मूषकराज तथा उंदीर मामा ठरले. कारण ज्या जलशुद्धीकरण केंद्रातून औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा होतो त्या ठिकाणी हे उंदीर मामा शिरल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला किंबहुना बंद झाल्याने औरंगाबाद मधील नागरिकांना पाण्यासाठी भर पावसात वणवण भटकंती करावी लागली, या प्रकरणाची आता सर्वत्र चर्चा सुरू असून तीव्र संताप देखील व्यक्त होत आहे. तसेच शहराच्या पाणी पुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत आहे. गेल्या आठवड्यात दोनवेळा तांत्रिक बिघाड झाला.
एका उंदराने शहराचा सुमारे ११ तास पाणीपुरवठा बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे. जायकवाडीत पंपगृहातील ‘मेनहोल’मध्ये उंदीर शिरल्यामुळे स्पार्किंग होऊन सोमवारी ( दि. १९) पहाटे पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे नवीन व जुन्या दोन्ही योजनांचा बंद पडलेला पाणी उपसा सुरू होण्यासाठी सुमारे १३ तास लागले. परिणामी, पाणीपुरवठा आगामी तीन ते चार दिवस विस्कळित होण्याची शक्यता पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यातील मुसळधार पावसामुळे बहुतांश जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान औरंगाबाद शहराला पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणात मुबलक पाणी असल्याने शहराला आता २ ते ३ दिवसांनी पाणी दिले जाते. पूर्वी पाण्यासाठी ५ ते ६ दिवस वाट पहावी लागत होती. दरम्यान काल अचानक शहराचा पाणीपुरवठा बंद पडला ही पाणीपुरवठा अचानक कसा काय बंद पडला? याचा शोध घेण्यात आला, तेव्हा चक्क एका उंदरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता.
पंप गृहातील फिडरमध्ये उंदीर घुसल्याने स्पार्किंग होऊन वीजपुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे पंपिंग बंद झाल्याचे समोर आले. त्यानंतर लगेचच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, या घटनेमुळे अकरा तास पाणीपुरवठा बंद राहिला. पंप क्रमांक ४ च्या फिडरमध्ये उंदीर गेल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाल्याचे कारण समोर आले. औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १०० एमएलडी आणि ५६ एमएलडीच्या दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. दोन्ही पाणी योजनांसाठी जायकवाडी धरणात पंपगृह उभारण्यात आलेले आहे. मात्र दोन्ही योजना बंद असल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला. आठवडाभरात शहराच्या पाणी पुरवठ्यात तिसऱ्यांदा बिघाड झाला आहे. यापुढे तरी असा प्रकार घडू नये आणि कोणताही लहान मोठा प्राणी किंवा पक्षी घुसून पाणीपुरवठा खंडित होऊ नये, अशी अपेक्षा औरंगाबादमधील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Entire City Water Supply Stop by Mouse
Aurangabad