इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – मालिकांमधील सासवा – सुनांची रंगणारी जुगलबंदी काही नवीन नाही. अनेक मालिका तर निव्वळ त्याच जोरावर चालतात. घराघरातील नातेसंबंध हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. म्हणूनच अशा मालिकांना प्रेक्षकवर्गही चांगला मिळतो. प्रेक्षकांची ही नस ओळखून अनेक वाहिन्या नवनवीन मालिका आणत असतात. या सगळ्यात झी मराठी ही वाहिनी पहिल्या स्थानावर आहे. दर्जेदार मालिकांच्या निर्मितीसाठी ही वाहिनी ओळखली जाते. लवकरच या वाहिनीवर सासू – सुनेच्या संबंधांवर आधारित मालिका येणार आहे.
‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’, असं या मालिकेचं नाव आहे. खोडकर सूनबाई आणि खट्याळ, मिश्किल सासूची गोष्ट यात प्रेक्षकांना पहायला मिळेल. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. काळ बदलतो आहे, तशी नातीही बदलत आहेत. सासू – सुनेचं नातंही अगदी तसंच आहे. ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ असं हे नातं. या नात्यावर आजवर अनेक लोकप्रिय मालिका येऊन गेल्या आहेत. त्यातील रिमा लागू – सुप्रिया पिळगावकर यांची तू – तू, मैं – मैं ही गाजलेली मालिका आजही रसिकांच्या लक्षात आहे.
बदलत्या काळानुसार त्यात बदल जरी होत गेले तरी भूमिका कशा बदलणार ना. हाच सूर पकडून या मालिकेची निर्मिती केली आहे. नेहमी प्रेमळ, शिस्तीच्या अशा भूमिकांमध्ये दिसणाऱ्या सुकन्या कुलकर्णी या खाष्ट सासूच्या तर स्वानंदी टिकेकर ही सुनेच्या भूमिकेत आहे. आणखीही काही प्रसिद्ध कलाकार या मालिकेत आहेत, पण त्यांची नावे निर्मात्यांनी अद्याप उघड केलेली नाहीत. 21 डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री 10 वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येईल.
शेर सासूबाईंच्या नशिबी सव्वाशेर सूनबाई…
ह्यांच्या स्वभावाला औषध नाही.नवी मालिका अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?
21 डिसेंबरपासून. बुध – शनि. रात्री 10 वा.#AgaAgaSunbaiKayMhantaSasubai #ZeeMarathi pic.twitter.com/xNZJC4BK3K— Zee Marathi (@zeemarathi) November 20, 2022
Entertainment Zee Marathi Channel New TV Serial
Sasubai Sunbai Son in Law Mother in Law