इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क- एक वेगळं कथानक असल्यामुळे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे काय असतं’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेच्या निमित्तानं मुख्य भूमिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभूला वेगळी ओळख मिळाली. सुरवातीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनातील आपले स्थान टिकवून आहे. आतापर्यंत या मालिकेत विविध ट्विस्ट, टर्न आलेले आहे. आता पुन्हा एकदा मालिका वेगळ्या वळणावर आली आहे. या मालिकेत आता नव्या कलाकाराची एंट्री होणार आहे. ‘बिग बॉस फेम विकास पाटील आता या मालिकेत झळकणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या माध्यमातून गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेत गौरी एका मोठ्या घरात मोलकरणीसारखी काम करत असते. तिला त्या घरातील लोक नेहमी घालून पाडून बोलत असतात. असे असले तरी आपल्या स्वभावामुळे घरात आणि प्रेक्षकांच्या मनात मालिका आणि गौरीने घर केलेलं आहे. अनेक ट्विस्ट या मालिकेत अगोदर दाखवण्यात आलेले आहेत.
तर मालिकेतील ज्योतिकाचे पात्र बदलण्यात आले होते. आता या मालिकेत ‘बिग बॉस’ फेम विकास पाटीलची एंट्री होणार असल्याचे बोलले जात आहे. अभिनयाचा बादशहा असलेला विकास या मालिकेत येणार असल्याने त्याच्या एन्ट्रीची उत्सुकता ताणली गेली आहे. तर त्याच्या येण्याने शिर्के पाटलांच्या घरात कोणती नवी वादळे येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
https://twitter.com/StarPravah/status/1559412223734386689?s=20&t=6rmz3a0fnx3nLMcPirDQ9Q
Shirke Patil Family
Star Pravah Entertainment New Changes TV Serial
#SukhMhanjeNakkiKayAsta