इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राडे, खेळ, मनोरंजन यांचा डबल धमाका घेऊन ‘बिग बॉस’ सीजन १६ वा लवकरच सुरू होत आहे. लवकरच येऊ घातलेल्या या सीझनमध्ये नक्की कोण कोण असणार या गोष्टींनी प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. २ ऑक्टोबर रोजी हा शो सुरू होणार असून नेहमीप्रमाणेच यंदाही अभिनेता सलमान खान या शोचा होस्ट असणार आहे. हा शो ऑन एअर होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना निर्मात्यांनी याचा एक प्रोमो रिलीज करत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. आता ‘बिग बॉस’मध्ये टीव्हीवरील दोन लोकप्रिय अभिनेत्री दिसणार असल्याचं वृत्त समोर आलंय. या दोन्ही अभिनेत्री या मनोरंजन विश्वातील बहुचर्चित सुना आहेत.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील गोपी बहुची भूमिका साकारणारी जिया माणेक आणि अभिनेत्री रिद्धीमा पंडित यांना यंदाच्या बिग बॉस सीझनसाठी निर्मात्यांनी ऑफर पाठवली आहे. रिद्धीमा पंडित बिग बॉस ओटीटीचा भाग राहिली आहे, पण ती शोमध्ये जास्त काळ टिकू शकली नव्हती. बिग बॉस ओटीटीपूर्वी रिद्धीमा ‘हमारी बहु रजनीकांत’ या मालिकेत मुख्य भूमिकेत होती. तर, जियाने लोकप्रिय मालिका ‘साथ निभाना साथिया’ अर्ध्यातच सोडली होती. त्यानंतर तिच्या जागी देवोलीना भट्टचारजीने गोपी बहुची भूमिका साकारली होती. दरम्यान, या दोघींना निर्मात्यांनी ऑफर पाठवली आहे, परंतु त्यांनी ती स्वीकारली आहे की नाही आणि या दोघी बिग बॉसमध्ये दिसणार की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.
रिद्धीमा आणि जिया दोघीही सध्या स्क्रीनवर दिसत नाहीयेत. साथ निभाना साथिया सोडल्यानंतर बराच काळ जिया माणेक पडद्यापासून दूर होती. नंतर ती ‘तेरा मेरा साथ रहे’ या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये येऊ शकली नाही, तसेच प्रेक्षकांनाही ती फार पसंतीस पडली नाही, त्यामुळे निर्मात्यांनी ती मालिका बंद केली होती. बराच काळ टीव्हीपासून दूर असलेल्या या दोन्ही अभिनेत्रींचे चाहते मात्र बिग बॉसमध्ये दिसणार असल्याच्या बातम्यांनी आनंदी दिसत आहेत. परंतु दोघींनी याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही, तसेच निर्मात्यांनीही त्यांच्या नावाबद्दल स्पष्टता केलेली नाही.
Entertainment TV Reality Show Big Boss16
Salman Khan Popular Daughter in Law
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/