मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – मुंबई नगरीत बॉलीवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री करोडो आणि अब्जावधी रुपयांची कमाई करतात. अभिनेता अक्षय कुमार हा हिंदी चित्रपट उद्योगातील सर्वात महागडा अभिनेता आहे, एका चित्रपटासाठी तो 125 कोटी रुपये घेतो. त्याचप्रमाणे छोट्या पडद्यावरील म्हणजेच टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेते आणि अभिनेत्री कमाईच्या बाबतीत चित्रपट कलाकारांपेक्षा कमी नाहीत.
अनेक टीव्ही स्टार्स जे बॉलिवूडच्या टॉप स्टार्सपेक्षा श्रीमंत आहेत. काही कलाकार रोज तीन ते पाच लाख रुपये कमावतात
कुणालाही आश्चर्य वाटेल की टीव्हीवरील डेली सोप म्हणजेच दैनिक मालिकेतील महिला कलाकार या एका दिवसात 3 ते 5 लाख रुपये कमावतात. त्यानुसार त्यांचे वार्षिक 18 ते 20 कोटी रुपये आहे. रुपाली गांगुली हिला छोट्या पडद्यावरील सर्वात महागडी अभिनेत्री म्हटले जाते.
रुपाली गांगुली :
आजच्या काळात अभिनेत्री रुपाली गांगुली भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’मध्ये मुख्य भूमिकेत आहे. याशोचे टॅप रेटिंग देखील खूप चांगले आहे. त्यामुळेच शोचे निर्माते रुपालीला फी म्हणून मोठी रक्कम देत आहेत. रिपोर्ट्सनुसार, तिच्या फीमुळे चर्चेत आलेली रुपाली आता सर्वात महागडी टीव्ही अभिनेत्री बनली आहे. रुपाली गांगुलीची लोकप्रियता ‘अनुपमा’ने गगनाला भिडली आहे. पूर्वी जिथे रुपाली एका दिवसासाठी 1.5 लाख रुपये घेत असे, आता तिची फी दुप्पट म्हणजे 3 लाख रुपये झाली आहे. सध्या ती आता भारतीय टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. रुपाली गांगुलीने इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय तरुणींना मागे टाकले आहे.
हिना खान :
टीव्ही इंडस्ट्रीची अक्षरा असो किंवा कसौटी जिंदगीची नवी कमोलिका , हिनाला सर्व जण ओळखतात. हिनाला प्रति एपिसोड किमान 80 हजार ते 2 लाख रुपये मिळतात.
दिव्या त्रिपाठी :
सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणार्या दिव्या त्रिपाठी हिला सध्या एका एपिसोड साठी सुमारे दीड लाख रुपये मिळतात असे म्हटले जाते. तिच्या अभिनयाचे अनेकजण चाहते आहेत.
अंकिता लोखंडे :
पवित्र रिश्ताची अभिनेत्री म्हणजेच अंकिता लोखंडे हिने भलेही बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले असेल, पण टीव्ही इंडस्ट्रीत येऊनही ती खूप नोटा छापत होती. ती एका एपिसोडसाठी दीड लाख रुपये घेत असे मात्र आता तिला थोडे कमी म्हणजे 90 ते 95 हजार रुपये मिळतात.
निया शर्मा :
तिच्या बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेल्या निया शर्माला एका एपिसोडसाठी सुमारे 80 ते 85 रुपये मिळतात.