इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – दिवसभराच्या धावपळीनंतर विरंगुळा म्हणून टीव्हीवरील मालिका पाहिल्या जातात. आणि म्हणूनच त्या लोकप्रिय होतात. प्रेक्षकांची नेमकी हीच नस पकडून गेली अनेक वर्षे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करतोय. यातील पात्र नेहमीच प्रेक्षकांना भावतात. सध्या मात्र मालिकेतील अनेक कलाकार मालिकेतून ब्रेक घेताना दिसत आहेत. यात आता चंपक चाचाचा देखील समावेश होण्याची चिन्हे आहेत. चंपक चाचाच्या चाहत्यांसाठी आता एक काळजी करण्यासारखी बातमी आहे. पुढील काही दिवस ते कार्यक्रमात दिसणार नाहीत. चंपक चाचाची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांना सेटवर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे
https://twitter.com/TMKOC_NTF/status/1593280996132401152?s=20&t=dYhXJ-2h17W5EhIoP3YAZg
मिळालेल्या माहितीनुसार ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या चंपक चाचा यांना एका दृश्यादरम्यान पळायचं होतं. पण, हे करताना त्यांचा तोल गेला आणि ते पडले. पडल्यामुळे अमित यांना दुखापत झाली आहे. सध्या ते बेड रेस्टवर असून काही दिवस शूटिंगपासून लांब राहणार आहेत. दुखापतीनंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या ते शूटिंग करू शकत नाही. त्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांनीही त्यांना आराम करण्यासाठी सुट्टी दिली आहे. अमित यांना दुखापत झाल्याने सेटवरील इतर कलाकारसुद्धा त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
मालिकेतील चंपक चाचा आणि जेठालाल यांचे सीन्स चाहत्यांना खूप आवडतात. त्यांच्यातील संभाषण हे कधी पोट धरून हसवणारं तर कधी भावूक करणारं असतं. अमित भट्ट यांनी ‘तारक मेहता..’शिवाय ‘खिचडी’, ‘येस बॉस’, ‘चुपके चुपके’, ‘फनी फॅमिली डॉट कॉम’, ‘गपशप कॉफी शॉप’, ‘एफआयआर’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय. इतकंच नव्हे तर त्यांनी सलमान खानच्या मेव्हण्याच्या ‘लव्हयात्री’ या चित्रपटातही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.
https://twitter.com/TMKOC_NTF/status/1592917916097429509?s=20&t=dYhXJ-2h17W5EhIoP3YAZg
Entertainment TMKOC TV Comedy Show Actor Break