इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा कार्यक्रम एकदम लोकप्रिय आहे. कितीही टेन्शन असो हा कार्यक्रम पाहून तुम्ही तुमचा सगळं ताण विसरताच. त्यामुळे हा कार्यक्रम आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. यातील दयाबेन म्हणजेच दिशा वाकनीने हा कार्यक्रम सोडल्यावर त्याजागी अभिनेत्री काजल पिसाळने दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. काही कारणाने तिची या भूमिकेसाठी निवड झाली नाही. पण या ऑडिशनचा फटका तिच्या करिअरला बसल्याचं तिचं म्हणणं आहे. केवळ या ऑडिशनमुळे आपल्याला काम मिळत नसल्याचा ठपका तिने ठेवल्याने वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मनोरंजन विश्व हे हे नेहमीच इतर क्षेत्रांपेक्षा वेगळं असत. कलाकारांच्या आयुष्याबद्दल चाहत्यांना फारच उत्सुकता असते. इथे कलाकारांच्या आयुष्यात काही ना काही सारखं घडत असता. असाच काहीसा प्रकार आपल्याबाबतीत घडत असल्याचे अभिनेत्री काजळ पिसाळचे म्हणणे आहे. कितीही टेन्शन असो पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ पाहिला की, ताण, टेन्शन पळून गेलंच पाहिजे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्माने नुकतीच १४ वर्ष पूर्ण केली. सध्या ही मालिका काहीना काही कारणामुळे चर्चेत असते.
१४ वर्षांच्या प्रवासात या मालिकेत अनेक नवीन कलाकार आले, तर काहींनी या मालिकेला रामराम ठोकला. या शोमधील दिशा वाकनी यांनी मालिकेतून एक्झिट घेतल्यावर त्याजागी नवी अभिनेत्री शोधण्याचं काम निर्मात्यांनी सुरू केलं. तेव्हा अभिनेत्री काजल पिसाळ हिने दयाबेन या पात्रासाठी ऑडिशन दिली होती. मात्र दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिल्यानंतर तिला अन्य शोसाठी विचारणा झाली नाही. काजल पिसाळ अखेरची ‘सिर्फ तुम’ या टीव्ही मालिकेत दिसली होती. ही मालिका बंद झाली. तेव्हापासून काजलकडे दुसरा कोणताच नवा प्रोजेक्ट नाही. ती नव्या कामासाठी प्रयत्न करत आहे मात्र तिला अद्याप कोणतेही नवे काम मिळालेले नाही.
एका मुलाखतीत आपल्या करिअरसंबंधी बोलताना काजलने तारक मेहताच्या निर्मात्यांना दोष दिला आहे. काजल पिसाळ म्हणाली, “मी दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन दिली होती पण बरेच दिवस वाट पाहूनही मला त्यांचा कॉल आला नाही. नंतर मला समजलं की माझं सिलेक्शन झालेलं नाही. पण काही प्रॉडक्शन हाऊसना असं वाटतंय की मी दयाबेनची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे मला नव्या प्रोजेक्ट्ससाठी कोणीच विचारणा करत नाही. मी ऑगस्टमध्ये या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. मी याआधी त्याबद्दल बोलले नाही कारण मी फक्त ऑडिशन दिली होती. मी वाट पाहत राहिले की मेकर्स काहीतरी बोलतील पण त्यांच्याकडून मला कॉल आला नाही.”
काजल पुढे म्हणाली, “ माझ्याकडे आता कोणतेही काम नाही पण प्रॉडक्शन हाऊस आणि कास्टिंग डायरेक्टर्सना वाटतं की मी ‘तारक मेहता’मध्ये दयाबेनची भूमिका करणार आहे, त्यामुळे ते कामासाठी मला विचारणा करत नाहीत. त्यांनी मला फोन करून विचारले की मी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ साइन केला आहे का? तेव्हा मला हे सर्व समजलं. त्यामुळे मला हे स्पष्ट करायचे आहे की ऑडिशन देऊनही ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या निर्मात्यांनी मला संपर्क केला नाही. एकंदर या ऑडिशनचा माझ्या करिअरला फटका बसला आहे.”
Entertainment TMKOC Daya Ben Actress Kajal Pisal
Audition