इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप हा चर्चेतला चेहरा आहे. मात्र, सध्या तो सिनेमामुळे चर्चेत नाही, तर एका वेगळ्याच हटके कारणामुळे चर्चेत आहे. किच्चा सुदीप ३१ गायी दत्तक घेणार आहे. पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत तो हा उपक्रम राबवणार आहे. पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत किच्चा सुदीप कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा ३१ गायी दत्तक घेणार आहे. कर्नाटकचे पशूसंवर्धन मंत्री प्रभू बी चौहान यांच्या निवासस्थानी किच्चाने गायीची पूजा केली. तसेच गायींच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या कामाचं त्याने कौतुक केलं.
विशेष म्हणजे पुण्यकोटी दत्तू योजनेचा सदिच्छा दूत म्हणून किच्चा सुदीपची निवड केली आहे. किच्चा म्हणाला,”मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यंदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त ११ गायी दत्तक घेतल्या आहेत. हे पाहूनच मी प्रत्येक जिल्ह्यातील एक गाय दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्याचे सुदीप सांगतो.
गो हत्या बंदी हा कायदा लागू झाल्यानंतर पुण्यकोटी दत्तू योजना राबवणारे कर्नाटक हे पहिलेच राज्य आहे. राज्यात त्यासाठी १०० गोशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या प्रत्येक गायीच्या देखभालीसाठी सरकार वर्षाला ११ हजार रुपये देणार आहे. लोकांना त्यांच्या इच्छेनुसार या गोशाळांना किमान १० रुपये दान करता येणार आहेत. या माध्यमातून आर्थिकदृष्ट्यादेखील गोशाळा सुदृढ करता येणार आहेत.
किच्चा सुदीप हे कन्नड सिनेमातील मोठं नाव आहे. सुदीपने केवळ कन्नडच नाही तर तामिळ, तेलगू आणि हिंदी सिनेमातही काम केलं आहे. त्याचे चाहते किच्चा सुदीप या नावाने ओळखत असले तरी सुदीपचं खरं नाव सुदीप संजीव आहे. 1997 मध्ये ‘थैवा’ या चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत झळकला. त्याला खरी ओळख दिली ती ‘ईगा’ अर्थात ‘मवखी’ या चित्रपटाने. त्याचा हा चित्रपट चांगलाच गाजला. किच्चा सुदीप आणि सलमान खान हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. या दोघांनी दबंग 3 सिनेमात एकत्र काम केलं. विशेष म्हणजे किच्चा सुदीपनं या चित्रपटासाठी मानधन घेतलं नव्हतं.
Entertainment South Superstar 31 Cow Adoption