मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवुड म्हणजेच हिंदी चित्रपट सृष्टी विषयी संपूर्ण भारतातील सर्वच प्रांतातील प्रेक्षकांना मोठे आकर्षण आहे. परंतु त्याच बरोबर अनेक प्रादेशिक भाषेत देखील विविध चित्रपट निर्माण होतात. विशेषतः दक्षिणेतील राज्यांमधील बिग बजेट चित्रपटांची सध्या मोठ्या प्रमाणावर सध्या चलती दिसून येते. इतकेच नव्हे तर साऊथ मधील या बिग बजेट चित्रपटांनी बॉलिवूडशी ही मोठी स्पर्धा केली असून त्यामुळे बॉलीवूड चित्रपट सृष्टीला जणू काही हादरा बसला आहे.
सध्या बॉक्स ऑफिसवर साऊथचे चित्रपट धुमाकूळ घालत आहेत. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ बाहुबली: द बिगिनिंग’ने यशाची एक नवीन व्याख्या तयार केली आहे. हा चित्रपट देशभरात अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. अभिनेत्यांच्या लोकप्रियतेपासून ते हिंदी पट्ट्यातील यशापर्यंत दक्षिणेतील निर्मात्यांसाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे.
एवढेच नाही तर या साऊथचे चित्रपट प्रदर्शित होण्याआधी बॉलीवूडचे मोठे चित्रपटही फिके पडत आहेत. इंडिया स्तरावर प्रदर्शित झालेले या यादीतील साऊथच्या 10 चित्रपटांचे बजेट कसे आणि किती होते ते जाणून घेऊ या…
1) बाहुबली: प्रभास स्टारर ‘बाहुबली’ एसएस राजामौली यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट 180 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता.
2) बाहुबली – 2: विशेष म्हणजे ‘बाहुबली 2′ आणखी यशस्वी ठरला आणि त्याचे बजेट 250 कोटी रुपये आहे.
3) केजीएफ’ : कन्नड अभिनेता यशच्या ‘केजीएफ’चे बजेट 80 कोटी आहे. हा चित्रपट देशभर हिट झाला होता.
4) ‘बाहुबली’ नंतर प्रभासचा ‘साहो’ आला. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर होती. त्याचे बजेट 300 कोटी होते.
5) Sye Raa Narasimha Reddy चे एकूण बजेट 250 कोटी आहे. या चित्रपटात चिरंजीवीसोबत अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
6) वल्लीमाई : अजितच्या ‘वल्लीमाई’ या चित्रपटात हुमा कुरेशीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे बजेट 150 कोटी आहे.
7) पुष्पा: द राइज : अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा: द राइज’ हा कोरोना कालावधीनंतरचा सर्वात यशस्वी चित्रपट आहे. हा चित्रपट 200 कोटींमध्ये बनला होता.
8) KGF Chapter 2′ : या मध्ये यशसोबत संजय दत्त आणि रवीना टंडन आहेत. ती 120 कोटींमध्ये बनवली आहे.
9)आरआरआर : एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ 550 कोटींमध्ये बनला आहे. चित्रपट अजूनही चांगला चालला आहे.
10) विजय सेतुपती दिग्दर्शित ‘बीस्ट’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये व्यस्त आहे. त्याचे एकूण बजेट 170 कोटी आहे.