इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिका हा प्रेक्षकांसाठी खरा विरंगुळा असतो. त्यामुळेच त्यात त्यांचे मन चांगले रमते. या मालिकांमधला लहान सहान बदलही प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून केला जातो. किंवा प्रेक्षकांना नको असेल तर एखादा बदल रद्दही केला जातो. प्रेक्षकांच्या प्रतिसादात एवढी प्रचंड ताकद असते.
‘जीवाची होतिया काहिली’ ही नुकतीच सुरू झालेली मालिका. विषयाचे वेगळेपण आणि कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळे अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय ठरते आहे. आता या मालिकेतही नवीन ट्विस्ट येणार आहे. लवकरच या मालिकेत एक नवीन अभिनेत्री येणार आहे. यामुळे मालिका वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे.
प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात सोनी मराठी वाहिनी आघाडीवर असते. वेगवेगळ्या विषयांवरील मालिकांची निर्मिती करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची भूमिका ही वाहिनी चोख पार पाडते आहे. सध्या येथे ‘जीवाची होतिया काहिली’ ही नवीन मालिका सुरू आहे. वेगळ्या धाटणीची अशी ही मालिका आपण म्हणू शकतो. मराठी आणि कानडी भाषिकांमधील प्रेमाची कथा यात आहे. प्रमुख भूमिकेत अभिनेता राज हंचनाळे आणि अभिनेत्री प्रतीक्षा शिवलकर हे दोघे असून या दोघांचाही मराठी आणि कानडी अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावतो आहे. सध्या मालिकेतील अर्जुन म्हणजेच राज हा रेवथी अर्थात प्रतिक्षाच्या प्रेमात पडला आहे. या दोघांमध्ये चांगली मैत्री होऊ घातली असून अर्जुन आपले प्रेम कधी व्यक्त करतो, याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. असे असतानाच आता आता मालिकेत एक नवीन एंट्री होणार आहे. ही नवीन एंट्री आहे मनीषा अर्थात सिमरनची.
सिमरन हिची ही पहिलीच मालिका असून ती तिची ही व्यक्तिरेखा कशी रंगवते याकडे सर्वांचे लक्ष आहे. सिमरन म्हणजेच मनीषा आल्या आल्या सर्वांची मनं जिंकते. यामुळे रेवथीची धुसफूस सुरू आहे. यामुळे अर्जुन आणि रेवथी यांच्यात भांडण होते का, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मालिका आता कोणते वळण घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/sonymarathitv/status/1589580928497565696?s=20&t=WcZB41WIQvk_umcA2KaHAA
Entertainment Marathi TV Serial New Entry
Jivachi Hotiya Kahili